Home »Divya Marathi Special» Thief Smell The Note

या चोराला येतो नोटांचा वास...

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 10, 2013, 06:11 AM IST

  • या चोराला येतो नोटांचा वास...

भोपाळ - मी घरात प्रवेश करताच मला नोटांचा वास येतो. देव प्रत्येकालाच कोणती ना कोणती देणगी देस असतो. त्याने मला ‘हातसफाई’ची देणगी दिली आहे...’ भोपाळमधील बागसेवनिया पोलिसांच्या हाती लागलेल्या बबलू सोपान या चोराने स्वत:च्या कारनाम्यांचे समर्थन अशा प्रकारे केले. बबलूसह पोलिसांनी त्याच्या इतर तीन साथीदारांनाही चोरीचा कट रचल्याप्रकरणी अटक केली आहे. चौकशी दरम्यान या टोळीने 20 ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आहे.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री त्यांना दोन बाइकवर चौघे जण उभे असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोलिसांनी चौघांना पकडल्यानंतर त्यांच्या कारनाम्यांची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि कॅमे-या सह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी सांगितले की, बबलू हा या चोरट्यांच्या टोळीचा म्होरक्या आहे. हे चौघेही एकटे किंवा टोळीने चोरी करत होते. भोपाळमधील विविध भागांत राहणा-या या चौघांची भेट जेलमध्ये झाली होती. त्यानंतर चौघांनी एक टोळी तयार केली. बागसेवनिया पोलिसांनी गेल्या वर्षी बबलूला पकडले होते. तसेच त्याच्याकडून 22 चोरीच्या घटनांची कबुली घेतली होती. या टोळीचे लांबलचक गुन्हेगारी रेकॉर्ड आहे.

प्रत्येक कुलूप उघडू शकतो- या टोळीतील बबलूला अमली पदार्थांचे व्यसन आहे. त्याने सांगितले की, अमली पदार्थांचे सेवन करताच त्याला नोटा आणि सोन्याचा वास येतो. तो कोणत्याही प्रकारचे कुलूप काही क्षणात उघडू शकतो असा त्याचा दावा आहे.

Next Article

Recommended