जे मंजुला, शास्त्रज्ञ
जन्म : १९६२
वडील : जे. श्रीरामुलू (शिक्षक होते)
शिक्षण : उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्समध्ये पदवी
चर्चेत - त्या डीआरडीओमध्ये पहिल्या महिला महासंचालक झाल्या आहेत.
मंजुला यांनी तयार केलेल्या रिस्पॉन्सिव्ह जॅमर आणि कंट्रोलर सॉफ्टवेअर लष्कराच्या तिन्ही दलांत कार्यान्वित करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी २०११ मध्ये डीआरडीओमध्ये सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला होता. मुलींच्या शिक्षणासाठी अनुकूल नसणारा तो काळ होता. मुलींनी शिकू नये या विचाराचे लोक होते. वडील शिक्षण क्षेत्राशी संबंधित होते. त्यामुळे त्यांनी मंजुला यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले होते. मंजुलांना गणित शिकण्याची इच्छा होती. मात्र, आई-वडील तिला शिकवू शकत नव्हते. त्यामुळे ती स्वत:च अभ्यास करत होती.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (डीआरडीओ) १९८७ मध्ये रुजू होण्याआधी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्येही काम केले. डीआरडीओत त्यांनी इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वाॅरफेअरसाठी काम केले व २६ वर्षांपर्यंत त्या हैदराबादच्या डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च लॅबमध्ये कार्यरत होत्या. जॅमरशिवाय त्यांनी तयार केलेले अन्य उपकरणे स्थलसेना, नौदल, हवाई दल आदीमध्ये उपयोगात आणली जात आहेत. डीआरडीओच्या महासंचालिका होण्याआधी त्या डिफेन्स एव्हियोनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (डीएआरई) मध्ये आपली सेवा देत होत्या. ही डीआरडीओची शाखा आहे.