आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी इतिहास घडवण्याच्या दिशेने प्रयत्न करत राहा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्यास घेतल्याने आनंद तर मिळतोच, तसेच सहनशक्तीची कल्पना येते. काही लोकांना वाटते की आनंदी राहणे हे एखाद्या जादूप्रमाणे आहे. मला वाटते की, आनंदी राहण्यासाठी ध्यास घेणे आणि संयम राखणेही आवश्यक आहे. सुखी आयुष्याच्या मार्गात येणा-या आव्हानांना तोंड दिल्यास आनंद मिळत असतो.


जपानी गिर्यारोहक युइशिरो मियुरो हे त्याचेच उदाहरण आहे. त्यांनी प्रथमच 70 व्या वर्षी आणि त्यानंतर 75 व्या वर्षी एव्हरेस्ट सर केले. 80 व्या वर्षी 23 मे 2013 मध्ये तिस-यांदा एव्हरेस्ट सर केले. उच्च शिखरावर गेल्यावर त्यांनी टीमला फोन केला आणि म्हणाले, ‘मी पुन्हा एकदा यश मिळवले आहे.’ त्यांनी पुढे सांगितले की, 80 व्या वर्षी मी एव्हरेस्ट सर करू शकेन, असे मला वाटलेही नव्हते. मी थोडा थकलो आहे, पण माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर क्षण आहे.


मियुरा आज ज्या स्थानावर आहेत, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या मुलीने सांगितले की, 2007 पासून त्यांना चार हृदयविकाराचे झटके आले आहेत. 2009 मध्ये स्कीइंग करताना त्यांना कमरेला दुखापत झाली होती. एवढ्या अडचणी आल्या तरी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि इतिहास घडवण्यावर लक्ष केंद्रित केले. मियुरा अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. तुम्हीही तुमचे लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित केल्यास ध्येय गाठणे फार कठीण नाही. तुम्हीही मियुरा यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवू शकता.