आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामच्या जीवनातील हे अाहेत 12 शिक्षक, जे प्रत्येक क्षणी देतात शिकवण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अापले जीवन, नातेसंबंध, अासपास घडणाऱ्या घटना, अनुभव, पशुु-पक्षी यांनाही शिक्षक मानून प्रत्येक क्षणी त्यांच्याकडून काहीना काही शिकू शकताे. दैनिक दिव्य मराठीच्या नजरेतून  प्रत्येक माणसाच्या जीवनात १२ शिक्षक असतात. ज्यांच्याकडून ताे काही ना काही शिकतच असताे. मात्र या गाेष्टींकडे अापण कधी  शिक्षकांच्या दृष्टिकाेनातून पाहिलेले नसते...

अापले पहिले शिक्षक
माता-पिता : जीवनात काही शिकण्याची सुरुवात यांच्यापासूनच हाेत असते. 

सर्वात परिवर्तनशील शिक्षक 
वर्तमानपत्र: राेज वर्तमानपत्रात घटना बदलत असतात, परंतु या सर्व घटना प्रभाव टाकतात.

सर्वात धैर्यवान शिक्षक
पुस्तके: कारण यांना कधी अापण पूर्ण, तर कधी अर्धवट वाचताे. परंतु ते शिकवण मात्र देतात.

सर्वात आक्रमक शिक्षक
शत्रू: याला मात देण्यासाठी तुम्ही  काेणत्याही परिस्थितीत संघर्षातून स्वत:ला सज्ज करता.

सर्वात जटिल शिक्षक
विद्यार्थी: कारण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अाधी शिक्षकांनाच खूप काही शिकावे लागते.

सर्वात भाेळा शिक्षक
प्रिय पशू: त्यांच्याशी तुम्ही वाईट वागलात तरी नंतर प्रेमाने बाेलावल्यास सर्व विसरून ते जवळ येतात.

अनंत शिक्षक
घडामाेडी : कारण, घटना- घडामाेडी अचानक घडतात, अाणि त्यातून काहीतरी शिकायला मिळते.

सर्वात महागडा शिक्षक
संकट : हा सर्वात महान शिक्षक. मात्र याची किंमत चुकवल्यानंतर फायदा मिळत असताे.

सर्वात कठोर शिक्षक
अनुभव : कारण एखादा धडा शिकवण्यापूर्वीच अनुभव हा परिणामाचीही जाणीव करून देताे.

सर्वात काेमल शिक्षक
लहान मुले : जेव्हा अापण त्यांच्यासाेबत राहताे तेव्हा त्यांच्यासारखेच वागताे, बाेलताे, विचार करताे.

अाश्चर्यकारक  शिक्षक
वेळ : वेळ प्रत्येकाला काही तरी शिकवत असते.

...अाणि सर्वात श्रेष्ठ सर्वात सखाेल शिक्षक 
मन :  जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला चांगल्या, वाईटाची अाेळख करून देते.
बातम्या आणखी आहेत...