आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Letter On Water Problem Will Defenately Make You Cry

आदरणीय 105 हुतात्म्यांनो.. \'चला हवा येऊ द्या\'मधील हे पत्र तुम्हाला करेल सुन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी मराठीवर सुरू असलेल्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमाने घराघरातील लोकांना खळखळून हसायला लावलं आहे. पण त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना हातही घातला जात आहे. आपल्या स्किटमधून या कार्यक्रमातील सदस्य गमतीदार पद्धतीने ठरवलेल्या विषयावर नेमके भाष्य करतात. त्याचबरोबर या कार्यक्रमातील पोस्टमन काका आपल्या पत्राच्या माध्यमातूनही विविध प्रश्न अशाच पद्धतीने मांडत असतात. मंगळवारी प्रदर्शित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागामध्येही या पोस्टमन काकांनी एक पत्र आणलं होतं. 105 हुतात्म्यांना लिहिलेलं हे पत्र जेव्हा त्यांनी वाचलं तेव्हा स्टेजवरील मान्यवर, हॉलमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चाहते आणि टिव्हीवर कार्यक्रम पाहणारे हजारो प्रेक्षक सगळेच सुन्न झाले होते. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर थेट भाष्य करणाऱ्या या पत्रामध्ये राजकारण करणाऱ्या नेत्यांबरोबर आमचे पाणी - आमचे पाणी म्हणाऱ्या नागरिकांवरही शब्दांचे आसूड ओढले होते.. ज्यांच्यापर्यंत हे पत्र अद्याप पोहोचले नसेल त्यांनी हे पत्र वाचावे आणि गांभीर्याने याचा सर्वांनी विचार करण्याची गरज असल्याने याठिकाणी हे पत्र आम्ही देत आहोत...

पुढील स्लाइड्सवर वाचा, पत्रातील मजकूर....
(पत्रातील मजकूर ठळकपणे लक्षात यावा म्हणून विविध स्लाइडवर पत्र विभागले आहे.)
अखेरच्या स्लाइडवर पाहा, VIDEO