आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आऊटफिट ते अ‍ॅस्केसरीपर्यंत व्हाइट बनला फेव्हरिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात पांढरे कपडे योग्य ठरतात. व्हाइट टॉप किंवा कुर्ती असो वा जीन्स पँट, सलवार-सूट किंवा पांढरी साडी असो. डिझायनर रिना ढाका म्हणतात की, चायना-ब्ल्यू किंवा सी-ग्रीन रंगावर व्हाइट परिधान केल्यास त्याचे सौंदर्य खुलते. पांढरा रंग अनेक प्रकारे परिधान करता येतो.
व्हाइटसह व्हाइट कलर
व्हाइट कलर मिक्स अँड मॅच करून वापरता येतो. उदाहरणार्थ व्हाइटसह व्हाइट कॉम्बिनेशन छान दिसते. त्यासाठी व्हाइट टॉप टोन-लेस किंवा व्हाइट प्लाझो पँट बीडेड हेम्सवर परिधान करता येईल. व्हाइट कलरचे सौंदर्य खुलवण्यासाठी ब्लॉक्ससह वापरा. उदाहरणार्थ सी-ग्रीन कलरचा धोती-ड्रेप्स स्कर्ट प्लेन व्हाइट ब्लाऊजवर घालावा. अभिनेत्री कॅरी मुलिगनप्रमाणे ब्लड रेड पंप्स प्लेन व्हाइट टॉप व ब्ल्यू स्कर्टवर परिधान करता येतील.
व्हाइट अँड ब्लॅकचा ट्रेंड
व्हाइट आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन नेहमीच पसंत केले जाते. हे मोनोक्रोम कलर अनेक डिझाइन व स्टाइलमध्ये वापरता येतात. डिझायनर हेमंत व नंदिता यांनी मोनोक्रोम, कटवर्क आणि पेपल्म या तीन ट्रेंडचे डिझाइन सादर केले. नंदिता म्हणाल्या की, पेपल्म व्हाइट पेन्सिल स्कर्टवर अतिशय सुंदर दिसतात.
भौमितिक छापाचे लेणे
भौमितिक छापाला (जॉमेट्रिक प्रिंट्स) समर-कूल ड्रेस म्हणता येईल. 70 च्या दशकातील हा ट्रेंड पुन्हा प्रचलित झाला आहे. आंतरराष्ट्रीय रॅम्प शोमध्ये डिझायनर इसाबेल मॅरेंट यांनी कुर्ती-स्टाइल एथनिक कुर्ता व्हेरिएशन्स सादर केले होते. ते धोती स्टाइल पँटवर परिधान करा.
सेलेब्सची आवड...
गौरी खानला व्हाइट कलर पसंत आहे. तिने प्लेन व्हाइट साडी, तर अनुष्का शर्माने व्हाइट हेरम पँट परिधान केली होती. या ड्रेसवर सिल्व्हर वर्क उठून दिसत होते. अभिनेत्री कंगणा राणावतप्रमाणे व्हाइट साडी गोटा-पट्टी बॉर्डरसह नेसता येते. ऐश्वर्या राय बच्चनने शिमरी-बीड साडी आणि अ‍ॅक्वा ब्ल्यू हॉल्टर ब्लाऊज घातले होते. कल्कि कोचलिनने साडीवर मॅचिंग कुंकू, भांग-टिळा, गळ्यात पर्ल आणि रुबी नेकलेस घालणे पसंत केले.
वेस्टर्न ड्रेसेसमध्येही...
डेनिमसह प्लेन व्हाइट टॉप परफेक्ट दिसतो. स्किन-फिट जीन्ससह व्हाइट क्रॉप्ड जॅकेट वा लाँग व्हाइट ड्रेस खुलतो.
सँडलवर क्रिस्टल वर्क
फ्लिप-फ्लॉप, हिल्स किंवा स्ट्रॅप सँडलवर क्रिस्टल किंवा स्वरोस्की वर्क सुंदर दिसत आहे. कूल लूकसाठी फ्लोअर-लेंथ ड्रेस, अंगरखा किंवा गाऊन सुंदर दिसेल.

लेखिका या 20 वर्षांपासून फॅशन लेखनात बहुचर्चित आहेत.
asmita.aggarwal@
dainikbhaskargroup.com