आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बल्ब अन् जेट इंजिनामुळे जीवन केले सुकर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला शोध घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी थॉमस एडिसन यांनी सन 1878मध्ये ‘एडिसन-इलेक्ट्रिक लाइट’ कंपनीची स्थापना केली. एकाच वर्षात कंपनीने डायनॅमोही तयार केले. दुसर्‍या अनेक उत्पादनांच्या निर्मितीनंतर या कंपनीचे नाव बदलवून ‘एडिसन जनरल इलेक्ट्रिकल’ करण्यात आले. त्या वेळी ‘थॉमस हॉस्टन इलेक्ट्रिक’ कंपनीने अनेक कंपन्यांचे अधिग्रहण करून ‘एडिसन जनरल इलेक्ट्रिकल’समोर आव्हान उभे केले होते. दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय वेगाने वाढत होता. त्यामुळे केवळ पेटंट व तंत्रज्ञानाच्या आधारावर प्रॉडक्ट बनवणे अवघड होत असल्याने 1892मध्ये दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेऊन ‘जनरल इलेक्ट्रिकल’ ही नवीन कंपनी स्थापन केली.

एडिसन अनेक वर्षे या कंपनीसोबत राहिले. त्यांनी जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रिकल रेल्वे इंजिन व ट्रान्सफॉर्मरही तयार केले. 1896मध्ये कंपनीने आपला आयपीओ काढला. अनेक नवनवीन उत्पादने तयार केल्यानंतर 1900मध्ये डॉ.विलीस आर.व्हिटनी यांच्या नेतृत्वाखाली संशोधन केंद्र सुरू केले. या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी 1912मध्ये अमेरिकन नौसेनेसाठी विजेचे उत्पादन करणारे जहाज आणि 1925मध्ये रेफ्रिजरेटर तयार केले. त्यानंतर कंपनीने रेडिओ आणि टीव्ही बनवण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. त्या वेळी रेडिओ व टीव्हीच्या रिसिव्हरला चांगली मागणी होती. त्यामुळे कंपनी ब्रॉडकास्टिंगच्या क्षेत्रातही उतरली. कंपनीने 1922मध्ये शॅनेटेडी रेडिओ स्टेशन ‘डब्ल्यूजीवाय’ला ऑनएअर केले.
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर कंपनीने विमानाची इंजिने बनवण्याचे काम सुरू केले. 1942मध्ये टर्बो पॉवर जेट प्रॉपिल्ड प्लेन डिझाइन करून तयारही केले. एक दशकानंतर ‘जे-79’ हे जेट इंजिन तयार केले. त्यामुळे विमान आवाजाच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने धावू लागले. 1950मध्ये कंपनीने टोस्टर, ओव्हन आणि ड्रायरसारखी उत्पादने जगाला दिली.

सन 1969मध्ये कंपनी अमेरिकेच्या ‘अपोलो’ या चंद्र मोहिमेत सहभागी झाली. त्यात कंपनीचे सहा हजार कर्मचारी विविध ऑपरेशन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. 1973मध्ये कंपनीच्या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ.इवार ग्योएवर यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दिला गेला. 1975मध्ये जीईच्या लायटिंग विभागाने बल्बची सर्वात जास्त निर्यात केली. 1981मध्ये जीईचे नेतृत्व जॉन एफ.वेल्च यांच्याकडे देण्यात आले. कंपनी ज्या क्षेत्रांत पहिल्या किंवा दुसर्‍या क्रमांकावर आहे, त्याच क्षेत्रांत काम करण्याचा निर्णय वेल्च यांनी घेतला. त्यामुळे कंपनीने घरगुती वापरासाठी असणारे छोट्या बल्बचे उत्पादन बंद केले. परिणामी, 12 बिलियनचा व्यवसाय केला आणि 26 बिलियनमध्ये अनेक नवीन कंपन्यांची खरेदी केली. 1997मध्ये कंपनीची मार्केट व्हॅल्यू 200 बिलियन डॉलर झाली. 20 वर्षांपर्यंत काम केल्यानंतर वेल्च यांना काढण्यात आले. कंपनीच्या मेडिकल सिस्टीमचे प्रमुख जेफ्री इमलेट यांची नियुक्ती वेल्च यांच्या जागी करण्यात आली. त्यांनी जीईला अपेक्षेपेक्षा जास्त पुढे नेले.

मी बल्ब बनवताना 10 हजार वेळा अयशस्वी झालो; परंतु असे 10 हजार मार्ग मी शोधून काढले, ज्यामुळे बल्ब बनवता येत नाही. - थॉमस एडिसन


(फोटो - थॉमस एडिसन यांचे संग्रहित छायाचित्र)