आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारित्र्यावर शिंतोडे: तीन देशांच्या तीन व्यक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपपंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतानाच तुरूंगात रवानगी

0बो शिलाई : चीनचे माजी वाणिज्यमंत्री
जन्म : 3 जुलै 1949
आई-वडील : हू मिंग (आई), बो यिबो (वडील)
शिक्षण : बीजिंगच्या नंबर 4 शाळेत, पीकिंग विद्यापीठ
प्रमुख पद: महापौरपदापासून सुरुवात, 2004- 2007 पर्यंत चीनचे वाणिज्यमंत्री
उपपंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याची बो शिलाई यांची तयारी होती; पण भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आणि तुरुंगाची हवा खात बसावे लागले. या प्रकरणामुळे कुणाला काही फरक पडला नसता, पण हे प्रकरण समोर येताच चीनमधील इतर नेत्यांचे कलंकित आणि रहस्यमय आयुष्य उजेडात आले. बो हे चिनी राजकारणातील राजपुत्राप्रमाणे होते. कारण त्यांचे वडील बो यिबो हे चीनमध्ये साम्यवाद रुजवणार्‍यांपैकी एक होते.
संघटित गुन्हेगारीविरोधात मोहीम उघडणार्‍या बो यांनी दोन विवाह केले आहेत. त्यांची दुसरी पत्नी गू कलाई ही वकील आहे. त्यांना दोन मुले आहेत. भ्रष्टाचाराने कमावलेल्या संपत्तीच्या आरोपांवर बो न्यायालयात म्हणाले ,‘मी अंडरवेअरही 50 वर्षांपूर्वीची घालतो. आईने घेऊन दिलेली.’ नव्या आर्थिक महासत्तेच्या रूपात उदयास येणार्‍या चीनमध्ये भ्रष्टाचार कोणत्या थरापर्यंत रुजलेला आहे, हे बो यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.


2011 मध्ये चोंगकिंग शहरातील हॉटेलमध्ये ब्रिटनमधील नील हेवूड या व्यापार्‍याचा मृतदेह आढळला. बो यांची पत्नी आणि शहराचे माजी पोलिसप्रमुख वांग लिजुन यांचा या प्रकरणात हात होता. दोघांनाही शिक्षा झाली आहे. मात्र, बो यांनी कोर्टात आणखी एक रहस्य उलगडले. त्यांची पत्नी आणि लिजुन यांच्यात अनैतिक संबंध होते आणि त्या दोघांवर कुणाचाही अंकुश नव्हता.


बो यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर फालून गांग संप्रदायाच्या लोकांनी नरसंहारासारखे गंभीर आरोप केले होते. त्यामुळेच उपपंतप्रधानपदावर विराजमान होण्याचे स्वप्न पाहूनही त्यांना चोंगकिंगसारख्या सामान्य शहराचे प्रमुख बनवण्यात आले. बो यांनी संपूर्ण शहरात वायर टेपिंग नेटवर्क लावले होते. त्यात सर्व कॉल रेकॉर्ड केले जात असत. त्यात राष्ट्रपती हू जिंताओ यांचेही कॉल होते. बो शिलाई यांच्या कणाकणात राजकारण आहे. त्यांचे वडील बो यिबो हे 1966 पासून 2007 पर्यंत म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत राजकारणातील बडे प्रस्थ होते. यिबो यांचे चौथे पुत्र असलेल्या बो यांना त्यांच्या राजकीय वलयाचा खूप फायदा झाला.