आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Women Creat Their Position Only Writing Crime World

आश्‍चर्यजनक: त्या तिघींनी गुन्हेगारीवरील लिखाणातून निर्माण केले स्वत:चे स्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खून, हत्या, लुटालूट, हेरगिरी आदी विषयांवर बहुतांश पुरुष लेखकच लिहितात. मात्र, आता महिलाही या विषयांत रस दाखवत आहेत. नवी दिल्लीमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या क्राइम रायटर्स फेस्टिव्हलमध्ये तीन महिला क्राइम रायटर्स मुख्य वक्त्या होत्या. त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील लिखाणाविषयी आपले म्हणणे मांडले. या तिघींविषयी जाणून घ्या...
अनिता राघवन, १८ वर्षे वॉल स्ट्रीट जर्नलशी संबंधित
अनिता यांचा जन्म मलेशियामध्ये भारतीय-अमेरिकी कुटुंबात झाला. या कुटुंबात जन्मला असाल तर तुम्हाला सर्वसाधारण अमेरिकीपेक्षा जास्त शिक्षण घ्यावे लागते, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. बाविसाव्या वर्षी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. या आनंदातूनच मी आई-वडिलांना पदवी प्रदान समारंभास उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र, पीएचडी केल्यानंतर येऊ, पदवीसाठी येण्यात काही अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांचे बोल ऐकून थक्कच झाले.
सर्वांचे आई-वडील येतील आणि माझ्याच आई-बाबांची गैरहजेरी राहील यामुळे मी निराश झाल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, त्यांना बळजबरी करून काही फायदा होणार नाही याची जाणीव झाली. त्यांच्या वडिलांचा जन्म केरळमधील एका छोट्या गावात झाला. प्रिन्स्टन विद्यापीठातून वनस्पतिशास्त्राची पदवी घेण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी तेथील वनस्पतिशास्त्राच्या प्रोफेसरांना पत्र लिहिले, प्रमाणपत्र पाठवले आणि प्रवेश मिळाला. ते ६० डॉलर घेऊन अमेरिकेत आले होते. अर्धवेळ नोकरी केली आणि येथेच स्थायिक झाले. त्यांनी जेवढे कष्ट घेतले त्यापेक्षा जास्त परिश्रम मी करावेत,अशी त्यांची इच्छा होती. अनिता यांनी वॉल स्ट्रीट जर्नलपासून करिअरची सुरुवात केली होती. २००८ मध्ये फोर्ब्जच्या लंडन ब्युरो चीफ म्हणूनही काम केले आहे.
शिक्षण: पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी
पुरस्कार: द बिलियनर्स अप्रेंटिस(पहिले पुस्तक जून-२०१३ मध्ये प्रकाशित झाले होते)

पुढे वाचा अमृता चौधरी विषयी...