आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य कुटुंबात जन्म, देशासाठी भरीव कामगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२००८ पासून ती प्रसिद्ध धावपटू पीटी उषा यांच्या प्रशिक्षण केंद्रात सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ १२ वर्षांची होती, वजन २६ किलो व उंची १४६ सेंमी. तिचे वडील आखाती देशात नोकरी करतात, आई लांब उडी क्रीडा प्रकारातील अ‍ॅथलिट होती. तिंतूने उषाची भेट घेतल्यानंतर उषा यांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले. टिंटूसाठी ती कधी प्रशिक्षक तर कधी मार्गदर्शकाच्या रूपात असते. तिंतूची धावण्याची शैली काहीशी वेगळी आहे आणि हीच शैली उषा यांना आवडते. ती दरराेज पाच किमी डोंगराळ भाग ओलांडून शाळेत जाते. कधीकाळी नाम्बियार उषाबाबत प्रभावीत होते, तसेच उषा यांची टिंटूबाबत भावना आहे.

२०११ ची घटना आहे. बेल्जियममधील लुवेनमध्ये फ्लेंडर्स चषकाचे आयोजन करण्यात आले होते. येथील विजयावर पुढे बरेच काही अवलंबून होते. मात्र, दुर्दैवाने टिंटू यात रौप्यपदकच जिंकू शकली. यामुळे तिची निवड लंडन ऑलिम्पिकसाठी होऊ शकली नाही. मात्र, आपल्या शैलीतून तिने वेगळेपण सिद्ध केले होते. ितने शायनी विल्सनचा १५ वर्षांचा विक्रम मोडीत काढला होता. टिंटू लंडन ऑलिम्पिक प्रवेशाचा दरवाजा ठोठावत होती,त्यावेळी तिची आई आणि बहीण एंजल कन्नूर जिल्ह्यातील तलापमध्ये पूरस्थितीमुळे एका छावणीत राहत होते. टिंटूचा खेळ टीव्हीवर दिसणार होता तेव्हा तेथील वीज गेली होती. त्यामुळे आई आणि बहिणीने कन्नूरमध्ये येऊन तिची कामगिरी पाहिली. आता आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत् सुवर्णपदक पटकावल्यानंतर ती जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
- टिंटू लुका, धावपटू
- जन्म- २६ एप्रिल १९८९
- आई- लिसी, वडील- लुका, एक बहीण
- शिक्षण- सेंट थॉमसमधून शालेय शिक्षण
- चर्चेत- नुकतेच तिने आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
बातम्या आणखी आहेत...