आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावमुक्त व सर्व शक्तीनिशी कामावर येण्याच्या पद्धती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळा-महाविद्यालयांतील सुट्या संपत आल्या असतील. उर्वरित काही दिवसांत मुलांसोबत स्वत:ला रिचार्ज करा. मात्र, या सुट्यांमुळे आपल्या समस्येत वाढ होऊ नये याकडे लक्ष द्या. सुट्यांचा सदुपयोग करण्याच्या टिप्सबाबत हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून वाचा..
(स्रोत : हाऊ टू हॅव फ्रेंड्स अ‍ॅट वर्क व्हेन यू आर द बॉस, पीटर ब्रेगमॅन)
सुट्यांचा उपयोग व्हावा यासाठी एक महिना आधी नियोजन करा
लोक तणाव घालवण्यासाठी सुट्या घेतात. मात्र, अनेक वेळा सुट्या तणावाचे कारण ठरतात. विशेषकरून ज्या वेळी त्याचे नियोजन झालेले नसते, अशा स्थितीत वेळ वाया जातो. सुट्यांचे योग्य नियोजन केल्यास, तुम्ही कामावर आनंदी आणि पूर्ण शक्तीनिशी जाऊ शकता. यासाठी बारीकसारीक गोष्टीवर लक्ष द्या. लॉजिस्टिक्समुळे तणाव वाढू शकतो, त्यामुळे चांगल्या ट्रॅव्हलरला सुट्यांचे नियोजन करण्यास सांगा. सुट्यांचे एक-दोन दिवस नव्हे, तर महिनाभर आधी नियोजन करा. नव्या-नव्या ठिकाणी जा. असे केल्यासही जास्त आनंदी राहाल. (स्रोत : व्हेन अ व्हॅकेशन रिड्यूस स्ट्रेस अँड व्हेन इट इज नॉट, शॉन अँकर)

तुम्ही बॉस किंवा लीडर असाल, तर ऑफिसमध्ये अशी मैत्री करा
तुम्ही बॉस असाल, तर कार्यालयात तुमचे मित्र कमी असतील हे उघड आहे. चांगला लीडर होण्यासाठी या गोष्टींवर लक्ष द्या. सर्वात आधी व्यावसायिक उद्देशांवर बांधिलकी असणे आवश्यक आहे. आयुष्यात काही प्राप्त करावयाचे असेल तर कठोर निर्णय घ्यावेच लागतील. मग तुमचे मित्र सर्व निर्णयाशी सहमत असतील असे नाही, तरीही तुम्ही सत्याचीच बाजू घ्यावी. कामात दृढ राहा. दुसरे, मैत्रीची कौशल्ये विकसित करा. दुसर्‍यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्यास कार्यालयात मित्र आणि बिझनेस लीडर बनू शकाल. तिसरे, संपूर्ण आयुष्यभवर मैत्री निभावली जाऊ शकत नाही, त्यामुळे मित्र गमावण्याची तयारी ठेवा. मित्रांमध्ये जे काही होत आहे, त्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट नियंत्रित करू शकत नाही. मित्रांना वगळून पुढे चालायला शिका.
दीर्घकालीन यशासाठी कामात भावनेची जोड द्या
एखादा आज तुम्हाला 75 रुपये देऊ करत असेल किंवा वर्षानंतर 200 रुपयांचे आश्वासन देत असेल, तर उघड आहे, तुम्ही 75 रुपये घेण्यास संमती द्याल. भविष्यातील मूल्यास डिस्काउंट केल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उदा. क्रेडिट कार्ड तारीख. पैसे किंवा कामामध्ये भावना आल्यास नुकसान होऊ शकते, मात्र एका नव्या संशोधनानुसार, कृतज्ञताभाव असलेल्या गोष्टींवर विचार करण्यास प्रोत्साहन दिल्यास, त्यांच्यात जास्त संयम दिसून येतो. जे लोक आयुष्यात नम्र असतात किंवा जे आभार व्यक्त करण्यावर विश्वास ठेवतात ते दीर्घकालीन विचार प्रक्रिया विकसित करू शकतात. अनेकदा सहनशक्ती कमकुवत होते हे आपणा सर्वांना माहीत आहे. यामुळे हे लक्षात येते की आभार व्यक्त केल्यामुळे कर्मचारी दीर्घकालीन यशाकडे लक्ष देऊ शकतात. (स्रोत : ग्रॅटिट्यूड इज द न्यू विलपॉवर, डेव्हिड)
ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये प्रत्येक सदस्याच्या कल्पनेवर लक्ष द्या
बहुतांश लोक ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमधून जातात. लोकांना नव्या कल्पना द्या आणि त्या देताना काही अडचणीही येऊ नये, अशी तुमची इच्छा असते. यासाठी या नियमांचा स्वीकार करा. पहिला, कोणतेही मत तयार करू नका. प्रत्येक विचार लिहा. ग्रुप मेंबर्सनी जे म्हटले आहे त्यावर लक्ष द्या. मत बनविल्याने सृजनशीलतेवर परिणाम होतो. दुसरा, गटाकडून नव्या कल्पना मागवून घ्या. एका विचारातून दुसरा विचार जन्माला येतो. ग्रुपच्या अन्य सदस्यांना सांगा की, ज्या वेळी दुसरा व्यक्ती बोलेल त्या वेळी त्याचे म्हणणे गांभीर्याने ऐका. तिसरा, प्रत्येक कल्पनेच्या मुळापर्यंत शिरण्याची आवश्यकता नाही. कल्पना समजून घ्या व पुढे जा.(स्रोत : एचबीआर- प्लेइंग टू विन स्ट्रॅटजी टूलकिट)

कंपनीसाठी चांगले ग्राहक ओळखा
कंपनीसाठी योग्य ग्राहकांची निवड केल्याने जास्त फायदा होईल. उदा.जास्तीत जास्त एक्झिक्युटिव्हज प्रायमरी कस्टमर ग्रुपची निवड करण्यास घाबरतात. मात्र, या धोरणात्मक निवडीतून व्यवसायाचा माहिती उघड होते. चांगल्या ग्राहकांची निवड खूप आवश्यक आहे. यामध्ये उत्पादन खरेदी करणारे किंवा सेवा घेणारे सर्व लोक येऊ शकतात. रिसेलर किंवा ब्रोकरही असू शकतात. चांगल्या ग्राहकांची अशी पारख केली जाऊ शकते- कंपनी कल्चर आणि मिशन : प्रायमरी कस्टमर कंपनीच्या कल्चर आणि मिशनसंदर्भात दुसर्‍यांशी चर्चा करतात. यामुळे अन्य लोकांची सृजनशीलता आणि शक्तीमुळे कंपनीला फायदा मिळू शकतो. क्षमता: कंपनी चांगल्या ग्राहकांवर खर्च करू शकते. यामुळे ग्राहक जोडले राहतील. यामुळे नफ्यात वाढ होईल. दीर्घकाळापर्यंत कंपनीशी जोडल्यामुळे कंपनीची प्रतिमा सुधारते. (स्रोत : चुजिंग द राइट कस्टमर, रॉबर्ट)