आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असे मिळवा पुन्हा त्वचेचे सौंदर्य !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या वयासोबत हातापायांवर शिरांचे जाळे दिसू लागते. या शिरा लपवण्यासाठी त्वचा अधिक सुंदर व निरोगी कशी राहील याकडे लक्ष द्या. हात धुण्यासाठी चांगल्या प्रतीचा साबण वापरा. हात अगदी दिवसभर अँटिसेप्टिकने धुण्याची गरज नसते. फक्त तीव्र प्रतीचा साबण किंवा हँडवॉश वापरू नका. यामुळे हातांना रुक्षपणा, अ‍ॅलर्र्जी किंवा रिअ‍ॅक्शन होऊ शकते. हातांवर क्रीम अवश्य चोळा. या क्रीममध्ये अँटीऑक्सिडंट किंवा रेटिनॉइडचे प्रमाण कमी असावे. रात्री झोपण्यापूर्वी हातांवर एएचए-अल्फा हायड्रॉक्सी अ‍ॅसिडयुक्त नाइट क्रीम लावा. त्वचा विशेषज्ञाचा सल्ला घेऊन फिलर ट्रीटमेंट करून घ्या. यामुळे हातांचे सौंदर्य परत मिळेल.


गर्भावस्थेत केस आणि त्वचा चांगले राहतात. हार्मोन्समध्ये बदल झाल्याने अनेकवेळा चेह-यावर डाग पडतात. हे टाळण्यासाठी तुमच्या वजनात होत असलेल्या वाढीकडे लक्ष द्या. वजन वाढल्याचे तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना सांगा. गर्भावस्थेत स्वत:ला शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवा. एखाद्या प्रशिक्षित फिटनेस एक्स्पर्टकडून व्यायामाचे वेळापत्रक आखून घ्या. त्वचेवर अँटिऑक्सिडंट तसेच क आणि ई जीवनसत्त्वयुक्त क्रीम आणि मॉइश्चरायझिंग लोशन लावा. जेवणात हळदीचे प्रमाण वाढवा. हळदीमध्ये असलेले घटक त्वचेसाठी लाभदायक ठरतात. रात्री झोपण्यापूर्वी आरबुटिन, कोजिक अ‍ॅसिड आणि फ्रूट अ‍ॅसिडयुक्त क्रीम लावल्याने त्वचा सुंदर होते. स्किन पॉलिशिंग ट्रीटमेंटमुळे फायदा होतो. चांगल्या त्वचारोगतज्ज्ञाकडूनच हा उपचार करून घ्यावा. त्यांना त्वचेवर हळुवारपणे उपचार करण्यास सांगावे.
-प्रिव्हेन्शन नियतकालिकातून