आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीप्स: तासाला फक्त एक मिनिट स्वत:सोबत घालवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यालयीन तसेच कौटुंबिक कारणांमुळे आपण ब-याचदा स्वत:लाच वेळ देण्याचे विसरून जातो. परंतु दर तासाला स्वत:साठी किमान एक मिनिटाचा वेळ काढायलाच हवा. त्यामुळे काम तर चांगले होईलच, शिवाय आयुष्यसुद्धा सुंदर बनेल. यासंबंधित काही टिप्स जाणून घेऊयात हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून.....

1. स्वत:शीच बोलत राहा, राग कमी होईल.
का म जास्त असले आणि निर्धारित वेळ संपत येत असेल तर खूप राग येतो. यासाठी वेळचे योग्य व्यवस्थापन, नकार देण्यास शिकणे व मल्टिटास्किंगपासून दूर राहणे हे उपाय ठरू शकतात. त्यासाठी तासाला स्वत:साठी एक मिनिटाचा वेळ काढा आणि हा प्रश्न विचारा की, आपल्याला जसे बनायचे होते तसे झाले काय किंवा त्यात काही बदल झाले? चांगला बॉस किंवा चांगले कर्मचारी बनू शकले काय? स्वत:वर नियंत्रण मिळवण्यासाठी एक मिनिटांचे चिंतन अनेकदा पर्याप्त असते. त्यामुळे राग आल्यास किंवा काही गोष्टी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे वाटल्यास स्वत:ला एक मिनिटाचा वेळ देऊन स्वत:वर नियंत्रण मिळवा.

पुढे वाचा... परफेक्ट बॉस बनून काम करणे कठीण