आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणासुदीत अशी मिळवा त्वचेला चकाकी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य बिघडते. अशा वेळी बाजारातील उत्पादनांचा वापर न करता नैसर्गिक उपाय करावेत. त्वचेचा श्वासोच्छ्वास नियमित होऊ द्या. त्यामुळे सणासुदीच्या काळात त्वचेवर चमक येईल.

फेसपॅक लावा: लिंबू किंवा फुलरचे फेसपॅक वापरा. हे आठवड्यातून एकदाच वापरा. फेसपॅक लावल्यानंतर 10 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर त्यावर गुलाबपाण्याचा स्प्रे मारा. तेलकट त्वचा असेल तर मध आणि लिंबू लावल्यास फायदा होईल. मुरूम असलेल्या त्वचेवरही याचा परिणाम होईल.
चेह-याचे तेज वाढवा: चेहरा आणि ओठांवर साजूक तूप किंवा लोणी लावल्यास चेह-यावर चमक येईल. किमान तासभर हा लेप चेह-यावर लावून ठेवावा. यामुळे चेहरा आणि ओठ अतिशय मऊ आणि चकाकदार होईल.

आहार असा घ्या: आहार चांगला नसेल तर कोणत्याही उपचारांचा परिणाम होणार नाही. चांगल्या त्वचेसाठी भरपूर प्रमाणात फळे आणि भाज्या खाव्यात. घरात शिजवलेल्या भाज्या आणि फळे खाल्ल्यास आणखी फायदा होऊ शकतो.

मेकअप बॉक्सकडे लक्ष द्या: कालबाह्य ठरलेली उत्पादने फेकून द्या. शांपू किंवा पाण्याने मेकअप बॉक्स स्वच्छ करा. त्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याचा धोका टळेल.
(प्रिव्हेन्शन मॅगझीनमधून)