आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वजन कमी करण्यासाठी योगाचे आठ मूळ घटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला वजन कमी करायचे असेल, शरीर संतुलित राखायचे असेल किंवा विचारांची प्रक्रिया सुधारायची असल्यास योग फायदेशीर ठरतात. अनेक ठिकाणी योग शिकवला जातो, मात्र संपूर्ण योग हा केवळ आठ घटकांवर आधारलेला आहे. त्यामुळेच त्याला ‘अष्टांग योग’ म्हटले जाते.

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे योगातील आठ मुख्य घटक आहेत. इसवीसन 200 मध्ये महर्षी पतंजली यांनी योगाची सूत्रे लिहिली. योगी पद्धतीने आयुष्य जगण्यासाठी आठ अंगे महत्त्वाची मानली गेली आहेत. संतुलन प्राप्त करण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया यामार्फतच केल्या जातात. या क्रियांद्वारेच शारीरिक तसेच मानसिक संतुलन प्राप्त करता येते.

हे पहिले आठ टप्पे प्रामाणिकपणे केल्यास तुम्ही योग्य पद्धतीने शरीराचा विकास करू शकता. पहिल्या चार क्रिया शरीरशुद्धीसाठी आहेत. त्यानंतरच्या चार प्रक्रिया उच्च पातळीवरील एकाग्रता, ध्यान आणि जागृतीसाठी आहेत.

यम : कसे राहावे, वर्तणूक कशी असावी.
नियम : मन शुद्ध राहण्यासाठी विचार कसे असावेत.
आसन : शरीर लवचिक बनवण्यासाठी हे करावे. त्यामुळे शरीर आणि मन यात ताळमेळ राहील.
प्राणायाम : दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घकाळ उच्छ्वासाची क्रिया.
प्रत्याहार : प्रत्येक अवस्थेत मन एकाच पातळीवर ठेवणे. इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे.
धारणा : एखादा संकल्प करणे.
ध्यान : एखाद्या गोष्टीवर संपूर्ण एकाग्रता, सजगतेसह विचार करणे.
समाधी : ही उच्च पातळीवरील अवस्था आहे. यात जागृतीसह इतर अनेक गोष्टींचीही माहिती मिळते.

या आठ प्रकारच्या टप्प्यांद्वारे शरीरात संप्रेरकांचे संतुलन साधणा-या रासायनिक क्रिया घडतात. या क्रियांमुळे वजन कधी कमी होईल ते कळणारही नाही. यामुळे मन प्रफुल्लित राहते. श्वासावर नियंत्रण राखत आसन केल्यास जास्त फायदे मिळतात. सूर्यनमस्कारांचेच उदाहरण घेतले तर प्रत्येक आसनात श्वास कुठे घ्यायचा आणि कुठे सोडायचा यावर बारकाईने लक्ष द्यावे लागेल.

योगाचे तीन बंध असतात. मूलबंध, उड्डियान बंध व जालंधर बंध. पहिला शरीराच्या खालील भागात, दुसरा पोटात तर तिसरा कंठावर असतो. आसन व प्राणायामाच्या मदतीने ग्रहण केलेली ऊर्जा साठवण्याचे काम या बंधांद्वारे होते. काही सेकंदांच्या बंधात आपल्याला खूप घाम फुटतो. त्यामुळे विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.