आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर चर्चेतून बाहेर पडण्याचे सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकांशी जुळवून घेत पुढे वाटचाल करा
आपण आपले ध्येय निश्चित करणे ही नेहमीच चांगली गोष्ट आहे. यामुळे खरे तर आपले लक्ष्य अगदी स्पष्ट असते. मात्र, ते सहजपणे गाठण्यासाठी प्रारंभीच उंच उडी घेण्यापेक्षा हळूहळू टप्पेवार पावले उचला. अशा छोट्या बाबी लक्षात ठेवल्या तरी आपले लक्ष्य गाठणे सोयीचे होईल. प्रारंभी आपले लक्ष्य काय आहे ते लिहून ठेवा किंवा आपले कुटुंबीय, मित्र आिण आप्तेष्टांना ते अगदी स्पष्टपणे सांगा. त्यांना तुमच्या या लक्ष्याबद्दल किंवा ध्येयाबद्दल काय वाटते याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. यानंतर दुसरे म्हणजे अ‍ॅक्शन प्लॅन तयार करा. तो साधा व सहज असायला हवा. लक्ष्य काय हे लिहिताना अगदी असाध्य गोष्ट लिहू नका. यातील छोटे-छोटे टप्पे लिहा. तिसरी बाब म्हणजे लक्ष्य गाठताना अिधक लोकांची गरज पडू शकते. म्हणून लोकांशी जुळवून घेत त्यांना आपलेसे करा. जसजसे आपण लक्ष्याच्या दिशेने जाल तशी तुमची व्यग्रताही वाढेल. कदाचित कालांतराने तुम्ही लक्ष्य काय हेच विसरून जाल. यासाठी कायम सतर्क राहा. लक्ष्य काय हे लक्षात ठेवा. यासाठी फोनमध्ये रिमायंडर किंवा कॅलेंडरवर लिहून ठेवू शकता.
(स्रोत- मेक युवर वर्क रिझोल्यूशन स्टिक)

एखादी गोष्ट किंवा चर्चा म्हणजे समस्या मानू नका
अनेक वेळा आपण एखाद्या गंभीर चर्चेत विनाकारण अडकून पडतो. अशा वेळी कुणाच्या भावना न दुखावता आपण अगदी सहजपणे त्यातून बाहेर पडू शकतो. यासाठी मुळात ही चर्चा गंभीर न मानता आपण याबाबत काहीसे उदास आहोत, अशी मनाची समजूत काढा. तीच भावना सकारात्मक मानसिकतेतून इतरांसमोर मांडा. एखाद्या व्यक्तीबाबत किंवा परिस्थितीबाबत आपण नकारात्मक विचार मांडणार नाहीत हे मनाशी बांधून घ्या.आपण फक्त आपली बाजू मांडत आहोत, हे मनात ठेवा. यामुळे आपण विषय पुढे नेऊ शकाल. यातून आपण महत्त्वाचे मुद्दे मांडू, लिहू शकाल. याबद्दल इतरांनाही काय वाटते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी स्वत:लाच काही प्रश्न विचारा. उदा. मूळ समस्या काय आहे, इतरांना त्याबद्दल काय वाटते? याबद्दल आपल्याला काही स्पष्ट आकलन होत नसेल तर हे मान्य करा की याची तुम्हाला काहीच माहिती नाही. चर्चेनंतर जे काही समोर येईल ते कोणताही न्यूनगंड किंवा भीती न बाळगता इतरांना सांगा. हे ऐकून इतरांना काय वाटेल, याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज नाही.
(स्रोत-हाऊ टू हँडल डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन)