आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीमसंदर्भात समाधानी नसल्यास हे बदल करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेझेंटेशनऐवजी चर्चेमुळे मिळतात अधिक फायदे
आयडियाज सांगण्यासाठी प्रेझेंटेशन ही सर्वात चांगली पद्धत आहे; परंतु प्रेझेंटेशन कोणताही विचार न करता तयार करून सादर केले जातात. त्यामुळे प्रेझेंटेशनऐवजी चर्चा करणे अधिक फायदेशीर आहे. तसेच मी कोणते काम ग्रुपसोबत वेळेवर पूर्ण करू शकतो? आपल्या टीमला एकाच पद्धतीने विचार करण्यासाठी किंवा पाऊल उचलण्यासाठी समजावण्याची गरज पडते का? हे प्रश्न स्वत:ला विचारले गेले पाहिजे. गु्रपसोबत चर्चा करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहमत होऊन त्यादृष्टीने पावले टाकली गेली पाहिजे. टीमसोबत चर्चा केल्यामुळे अनेक नवीन आयडिया मिळतात. त्यामुळेच चर्चेचा मार्ग अवलंबणे हे प्रेझेंटेशनपेक्षा प्रभावी ठरेल. प्रेझेंटेशन करताना संवाद एकतर्फी होतो, तर चर्चा करताना दोन्ही पद्धतीने संवाद साधून नवनवीन आयडिया मिळतात.
(स्रोत : अ प्रेझेंटेशन इज नॉट ऑलवेज द राइट वे टू कम्युनिकेट, नेसी दुवाते)

योग्य कोच निवडण्यासाठी हे उपाय लक्षात ठेवा
जोपर्यंत तुम्ही स्वत:ला बदलू इच्छित नसाल तोपर्यंत कोणताही कोच तुमच्यात बदल घडवून आणू शकत नाही. त्यामुळे आपला विश्वास कोचकडे जाहीर करा; परंतु त्यापूर्वी आपल्याला चिअर लीडरची गरज आहे की कोचची? यासंदर्भात निर्णय घ्या. अनेक चांगले कोच लोकांना आकर्षित करू शकतात; परंतु चांगला कोच आपल्या मार्गदर्शनावरच
विश्वास ठेवतो. तो तुमच्याशी चांगल्या गोष्टी करू शकणार नसला तरी, योग्य मार्गदर्शन मात्र करू शकेल. त्यामुळे आपल्याला क्रिटिक गरजेचे आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.
(स्रोत : गेट द मोस्ट आऊट ऑफ एक्झिक्युटिव्ह कोचिंग, स्टीव्हन वर्गलेस)

आत्मविश्वासासाठी छोटे-छोटे विजय मिळवा
आत्मविश्वासामुळे सकारात्मक निकाल मिळतात. हा व्यक्तिमत्त्वाशी निगडित गुण नाही. ही अशी परिस्थिती असते, ज्यामुळे प्रेरणा मिळते. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आत्मविश्वास कायम राखणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करा... 1) लक्ष्य मोठे व पूर्ण करणे अवघड असेल तर लीडर असे सांगतात की, आपण मोठे, कठीण, धाडसी लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असतो; परंतु केवळ मोठे लक्ष्य ठेवल्यामुळे आत्मविश्वास कमकुवत होऊ शकतो. कारण जय-विजय हे वारंवार मिळतच असतात व त्यातून आत्मविश्वास मिळत राहतो. एक छोटे पाऊल मोठ्या लक्ष्याकडे नेते. 2) अपयशाला कोणालाही जबाबदार ठरवू नका. तसेच कोणाच्या चुकीच्या कामाची जबाबदारी घेतल्यास आत्मविश्वास वाढतो. कठीण परिस्थितीतून मार्ग काढावा. कारण कंपनीत काम करताना इतरांवर आरोप केल्यास आत्मविश्वास कमी होतो.
(स्रोत : ओव्हरकम द एट बॅरिअर्स टू कॉन्फिडन्स, रोजा बेथ मॉस केंटर)

टीमला सक्रियतेसाठी कायम प्रश्न विचारत राहा
बौद्धिक पातळीवर जागरूक राहिल्यास नवनवीन गोष्टींवर लक्ष ठेवण्यास मदत मिळते. स्वत:ला सक्रिय ठेवण्यासाठी या पद्धती अवलंबा... 1) टीमला प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करा. या पद्धतीने काम करण्याचे अनेक फायदे आहेत. कारण प्रश्न उपस्थित झाल्याने नवीन संधींची ओळख होते आणि त्यातून फायदे उचलण्यास मदत मिळते. 2) आपले विचार पूर्णत: पारदर्शक ठेवा. त्यामुळे तुमच्या मनात दुसर्‍या व्यक्तींसंदर्भात नकारात्मक विचार येणार नाहीत. 3) घटनेकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो त्यातून तणाव निर्माण होत असतो; घडलेली घटना तणावास जबाबदार नसते. तुम्ही जबाबदारी उचलण्यास तयार असाल, तर हे काम आपण पूर्ण करू, असा आत्मविश्वास ठेवा. त्यामुळे टीममध्येही आत्मविश्वास निर्माण होईल. (स्रोत : माइंडफुलनेस इन द एज ऑफ कॉम्प्लेक्सिटी, एलिसन बिअर्ड )

चांगली टीम बनवण्यासाठी घ्या कठोर निर्णय
व्यवस्थापकास यशस्वी होण्यासाठी चांगली टीम तयार करावी लागते; परंतु जेव्हा कोणी नवीन जबाबदारी सांभाळतो तेव्हा ज्या कर्मचार्‍याचा परफॉर्मन्स चांगला नाही त्याला काढून टाकताना घाबरतो. असे कठोर निर्णय घेताना आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे संबंधांकडे लक्ष न देता आपल्याला काय अधिकार दिलेले आहेत, त्यांचा वापर केला पाहिजे. तुम्हाला चांगल्या परफॉर्मन्ससाठी नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. त्यासाठी चांगली टीमही तयार करावी लागेल. ही पावले जितक्या वेगाने उचलली जातील, तितके लवकर तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच तुम्हाला कर्मचार्‍यांबाबत साशंकता असल्यास एखादी असाइनमेंट देऊन त्यांची परीक्षा घेता येईल वा इतर सहकार्‍यांशी चर्चा करून त्यांचा परफॉर्मन्स समजून घेता येईल. त्यानंतरही टीमसंदर्भात समाधानी नसाल तर तुम्ही कठोर निर्णय घेतला पाहिजे.
(स्रोत : इफ यू हॅव जस्ट टेकन ओव्हर अ टीम, क्लिकली लेट अंडरपरफॉर्मन्स, गो-रॉन एस्केनास)