आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढता तणाव अन् प्रदूषणात चिरतरुण राहण्याच्या पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढते प्रदूषण आणि तणाव तसेच जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे चिरतरुण राहणे कठीण होत चालले आहे. कॉस्मेटिक सर्जरीच्या मदतीने दीर्घकाळ त्वचा तजेलदार ठेवता येते. त्यासाठी सध्या अनेक नॉन सर्जिकल पर्यायही उपलब्ध आहेत. यात डर्मल फिलर्स, लिक्विड फेसलिफ्ट, लेजर आणि हीट ट्रीटमेंटसारखे अनेक लोकप्रिय पर्याय आहेत.

लेजर स्किन रिसर्फेसिंग : उन्हामुळे खराब झालेल्या त्वचेवर उपाय म्हणून फ्रॅक्शनल रिसर्फेसिंगचा वापर करता येतो. लेजर तंत्रज्ञानावर आधारित असल्याने यामुळे त्वचेची बांधणी उत्तम होते. त्यासाठी कोलेजन प्रॉडक्शन वाढवले जाते. इतर पद्धतींपेक्षा यात लवकर त्वचा भरून येते.

केमिकल पील- सुरकुत्या कमी करण्यासाठी ही पद्धत वापरतात. यात अ‍ॅसिड सोल्यूशनच्या मदतीने त्वचेचा वरील थर काढला जातो.

बोटॉक्स अँड फिलर्स : त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी बोटॉक्समध्ये वाहिन्यांना स्नायूंपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जाते. त्यामुळे त्वचा मुलायम होते. फिलर्सचा वापर दोन वेळी करतात. खड्डे भरून काढण्यासाठी तसेच चेहर्‍याचे सौंदर्य वाढवण्याकरिता वापर होतो.

लेजर असिस्टेड लिपोसक्शन : शरीरातील काही चरबी व्यायामाने कमी होत नाही. लेजर आधारित लिपोसक्शनमध्ये फॅट्स गरम करून त्यांचे द्रवरूपात रूपांतर केले जाते. १२ ते २४ तासांत ते शरीराच्या बाहेर पडतात. यात रिकव्हरी टाइम कमी आहे.

उपचाराच्या अन्य पद्धतींप्रमाणे नॉन सर्जिकल कॉस्मेटिक ट्रीटमेंटमध्येही जोखीम असू शकते. केमिकल पीलमुळे चेहर्‍यावर डाग किंवा त्वचेचा रंग बदलल्यास धोका संभवू शकतो. फिलर्समुळे चेहर्‍यावर रिअ‍ॅक्शन होऊ शकते. मात्र, कॉस्मेटिक सर्जरीच्या तुलनेत या पद्धतीत कमी जोखीम आहे.

डॉ. कुलदीप सिंह,
वरिष्ठ सल्लागार, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी, इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालय, नवी दिल्ली