आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tips: जाणून घ्‍या, केस गळतीची ७ मुख्य कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केस गळणे ही बऱ्याच महिलांची मुख्य समस्या आहे. मात्र त्याची कारणे अनेकदा समजू शकत नाहीत. त्यामुळे उपचारही चुकतात. काही तज्ञांची मते याविषयी मेघा कृपलानी यांनी घेतली आहेत. जाणून घ्या...

1. रजोनिवृत्ती : रजोनिवृत्तीच्या काळात महिलांचे ऑइस्ट्रोजेन व प्रॉजेस्ट्रोन कमी होते व मेल हार्मोन अँड्रोजन वाढते. त्यामुळे केस गळू लागतात. ४० % महिलांना ही समस्या येते, असे दिल्लीचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. चिरंजीव छाबडा यांनी सांगितले. अँड्रोजन केसांची मुळे कमकुवत करतात, असे मुंबईचे त्वचारोगतज्ज्ञ अप्रतिम गोयल यांनी सांगितले.
> प्लेटलेट रिच प्लाझ्मा इंजेक्शन आणि पेपटाइड मिसोथेरेपी घ्यावी.

2. आहार : आयर्न, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केस गळत असल्याचे गुडगावचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नरेश जैन यांनी सांगितले. तुमचा आहार संतुलित नसेल तर शरीराची नवे केस उगवण्याची क्षमता राहत नाही. दैनंदिन ऊर्जानिर्मितीतच सर्व सत्त्व जळते. >फळ, गूळ, पनीर, पालेभाज्या इत्यादी.

पुढे वाचू इतर कारणांविषयी...