आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता महागाईतच जगण्‍याची सवय लावून घ्‍या...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नऊ महिन्यांनंतर व्याजदर घटले आहेत. महागाई दर कमी होईपर्यंत व्याजदर कमी करणार नाही यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अडून बसले होते. चलनवाढीचा दर 4-4.5 टक्क्यांवर येण्याची वाट पाहत होते. याच हट्टापायी त्यांनी अर्थमंत्र्यांनाही नाराज केले. दुस-या तिमाहीतील पतधोरण आढाव्यानंतर 30 आॅक्टोबरला चिदंबरम म्हटले होते, ‘चलनवाढीप्रमाणेच आर्थिक विकासाचे आव्हान आहे. या स्थितीत फक्त सरकारलाच लढायचे असल्यास आम्ही एकटेच त्या दिशेने पुढे जाऊ.’ या वक्तव्याचे पडसाद सुुब्बाराव यांच्या निर्णयावर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महागाई कमी होणार नाही, असे संकेतही मिळत आहेत. चलनवाढीचा दर 7 टक्क्यांच्या आसपासच राहील. तो 4-4.5 टक्क्यांवर कधीही येणार नाही. त्यामुळे वाढीव दरच सामान्य असल्याची सवय लावून घ्यावी लागणार.

महागाई कशी? खाद्यपदार्थ महागणार, कांद्याच्या किमतीही उसळत आहेत. इतर भाज्याही वधारू शकतात. गहू तसेच इतर रब्बी पिकांचे किमान हमी भाव वाढवण्याचा दबावही सरकारवर आहे. सबसिडीत कपात झाल्यामुळे डिझेलही दर महिन्याला महाग होणार आहे. स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडी मर्यादित झाली आहे. नुकत्याच वाढलेल्या रेल्वेदरांचा परिणामही दिसून येणार. गरिबांना स्वस्त धान्य दुकानांचा नव्हे, तर बँक खात्यांचा दिलासा मिळणार आहे. म्हणजे बाजारात जास्त पैसा येणार, चलन वाढेल आणि महागाईदेखील वाढेल.


समस्या वृद्धीची की बजेटची- गेल्या 2-3 वर्षांत विकासदर 8.5 टक्क्यांवरून घसरून 5.5 टक्क्यांच्या आसपास गोठला आहे. आता व्याजदर घटल्यामुळे विकासदराला चालना मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर यूपीए-2 चा अखेरचा अर्थसंकल्प आगामी महिन्यात सादर होणार आहे. निवडणुकांसाठी चांगले चित्र उभे करण्याची सरकारला गरज आहे. या वर्षीच्या कामगिरीवरच पुढील वर्षी मतदान केले जाणार आहे. त्यामुळे सध्या लक्ष फक्त निवडणुकांवरच आहे.