आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tobey Maguire Moves Through Chess King Bobby Fischer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्क्रीनवर फिशर-स्पास्की यांच्यात रहस्यमय लढत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध बुद्धिबळपटू बॉबी फिशरच्या जीवनावर आधारित चित्रपट-पान सॅक्रीफाइसमध्ये टोबी मेगायर (स्पायडरमॅन फेम) मुख्य भूमिका साकारत आहेत. २५ सप्टेंबरला रिलीज होणार्‍या या चित्रपटात शीतयुद्धाच्या तणावादरम्यान बुद्धिबळपटूच्या ग्लोबल उदयाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मेगायर सांगतात, आम्ही या चित्रपटाला स्पोर्ट््स फिल्मचे रूप देऊ इच्छितो. मेगायरशी झालेली बातचीत संक्षिप्त स्वरूपात...

बुद्धिबळ हा मानसिक खेळ आहे. त्याला पडद्यावर रहस्यमय आणि नाटकी स्वरूपात सादर करताना आपल्याला कसे वाटले.
{चित्रपट आणि त्यातील पात्रांना आम्हाला खेळातील चढ-उतारांचा भाग बनवायचे होते. चित्रपटाला स्पोर्ट््स मूव्हीसारखे बनवण्याची इच्छा होती. बॉबीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला कुणाचाही अहंकार नष्ट करणे चांगले वाटते.’ शेवटी एका वेळी लोकांना वाटते की, ते जिंकू किंवा हरू शकतात. बॉबी अशा प्रकारे गोष्टी प्रकाशात आणू इच्छित होते.

बहुतेक लोक बुद्धिबळाला खेळ मानत नाहीत...
{काही लोकांनी या चित्रपटाला वेस्टर्न म्हटले आहे. ज्यात बॉबी फिशर आणि त्यांचे सोव्हिएत प्रतिस्पर्धी बोरिस स्पास्कीमध्ये लढत आहे. मी कधीच त्याला वेस्टर्न मूव्हीच्या रूपात पाहिले नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीची वेगळ्या प्रकारे व्याख्या करू शकता.
चित्रपटात बॉबीची कमतरता- त्याचा वेडेपणा, त्याच्या रागाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मानसिक आजारामुळे बॉबीचा स्वभाव असा झाला आहे.

तुम्हाला बॉबीची स्तुती करण्यालायक त्यात कोणती गोष्ट आढळली?
{ते कठोर मेहनत घ्यायचे. बॉबीने बुद्धिबळाद्वारे लोकांचे संबंध बदलले. बॉबी त्या युगात समोर आले जेव्हा आपण मुख्य प्रवाहापासून वेगळे होऊन व्यवहार करणार्‍या व्यक्तीच पसंत करायचो. त्याचे अँटी हीरोच्या रूपात पुढे येणे आश्चर्यकारक होते.

बॉबीने लहानपणी बुद्धिबळ खेळणे सुरू केले होते. तुम्हाला काय आवडायचे?
{मला बीटल्स आवडायचे. माझ्याकडे असे काहीच नव्हते ज्याच्याशी मी जोडलेला राहीन.मी लिंकन लॉग्स, लेगो आणि बीटल्सच्या मध्ये झुलत होतो.