आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज पितृदिन: जबाबदारी शब्दाचे मूर्त रूप म्हणजे वडील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील... म्हणजे क्षणोक्षणी, पावलोपावली एक नवे आव्हान स्वीकारणारे. कुठल्याही स्थितीत अखेरपर्यंत आपली जबाबदारी पूर्ण करणारी एक प्रेरणा. अत्यंत थकवणाऱ्या अनंत जबाबदाऱ्या असूनही नेहमी स्मितहास्य. जबाबदारी हा जगातील सर्वात मोठा शब्द. तो मूर्त रूपात आल्यास हुबेहूब वडिलांप्रमाणेच दिसला असता. अर्थात ही जाणीव सर्वांना आहे; पण अशा पद्धतीने आपण कधी विचारच केला नाही.  

ईश्वर: संपूर्ण जगाची जबाबदारी घेतली, त्यामुळेच जगत्पिता
संपूर्ण जग चालवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळेच ईश्वराला जगत्पिता संबोधले जाते. अशा प्रकारे सर्वोच्च जबाबदारी निभावणे याचाच अर्थ वडील होणे. प्रत्येक वडील आपापल्या संसारातील जबाबदारी पार पाडत आहेत. ते ईश्वराप्रमाणेच आपल्या मुलांच्या चांगल्या-वाईटाकडे लक्ष ठेवतात. त्यांना योग्य मार्ग दाखवतात.
ईश्वर प्रत्येक क्षणी जगासाठी आव्हान घेऊन येतो. वडीलही असेच कठोर राहून, कडक नियम तयार करून मुलांना श्रेष्ठ बनवतात.

पुढील स्‍लाइडवर वाचा... राजा भरत, भीष्‍म आणि पैगंबर यांच्‍याविषयी...   
बातम्या आणखी आहेत...