आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासात आज: १४ फेब्रुवारीला काही महान व्यक्तींचा झाला होता जन्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅलेंटाइन डे- २७८ इसवी सन- रोममध्ये संत व्हॅलेंटाइनला प्रेम करणा-यांचे समर्थन केल्याबद्दल मारण्यात आले होते. रोम शासक क्लाउडियसने विवाहावर बंदी आणली होती. व्हॅलेंटाइनने मात्र त्याचे जाहीर समर्थन केले होते.
शहाजहानचा शपथविधी- १६२८- पाचवा मुघल सम्राट शहाजहानचा याच दिवशी शपथविधी समारंभ पार पडला होता. त्याने आपली पत्नी मुमताज महलच्या स्मृतीमध्ये ताजमहाल बांधला होता. नंतर ही वास्तू प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखली गेली.
मधुबाला- १९३३ - मुघल-ए-आझम, महल आणि चलती का नाम गाडीसारख्या संस्मरणीय चित्रपटात काम करणारी अभिनेत्री मधुबालाचा दिल्लीत झाला होता जन्म.
मोठा निर्णय- १ ९८९-सर्वोच्च न्यायालयाने भोपाळ वायू गळती कांडप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर दिला होता निवाडा. अमेरिकेच्या युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन आणि युनियन कार्बाइड इंडिया कंपनीला एकरकमी ७१० कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते.