आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकचा आज 10 वा वाढदिवस, या पाच जणांनी केली जगात कमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांनो, फेसबुक हा शब्द माहीत नसलेला आपल्यापैकी कुणी आहे का? नक्कीच नसणार. ‘फेसबुक’ हे नाव कसे आले माहीत आहे काय? अमेरिकेतील अनेक कॉलेजेस आणि विद्यापीठे आपल्या विद्यार्थ्यांची माहिती छायाचित्रांसह प्रसिद्ध करत असतात. ही एक प्रकारची डिक्शनरीच आहे. याच डिक्शनरीला ‘फेसबुक’ असे म्हटले जाते. आज जगात सगळीकडे लोकप्रिय असणार्‍या संकेतस्थळात फेसबुक वरच्या स्थानावर आहे. ही एक ‘सोशल नेटवर्किंग साइट’ आहे. याचा जनक आहे मार्क एलिऑट झुकेरबर्ग हा 29 वर्षांचा युवक.

झुकेरबर्ग हा अमेरिकन विद्यापीठाचा ‘कॉम्प्युटर प्रोग्रामर’ आहे. आजपासून बरोबर 10 वर्षांपूर्वी म्हणजे 4 फेब्रुवारी 2004 रोजी त्याने आपल्या हार्वर्ड विद्यापीठातील चार मित्रांना सोबत घेऊन फेसबुकची स्थापना केली. त्यांची नावे एडुआडरे सेव्हरिन, अँड्रय़ू मॅक्कॉलम, डस्टिन मॉस्कोविट्ज आणि ख्रिस ह्युजेस. सुरुवातीला फक्त कॉलेजमधील त्यांची काही मित्रमंडळी या साइट्सची सभासद होती. नंतर बोस्टन येथील कॉलेज तरुण -तरुणी याचे सभासद झाले आणि हळूहळू तरुण वर्गात याची लोकप्रियता वाढू लागली. बघता बघता येथील सभासदांची संख्या वाढू लागली. सप्टेंबर 2013 पर्यंत ही संख्या 1.2 अब्ज झाली. 538 दशलक्ष डॉलर्सची उलाढाल आज ही कंपनी करते. सन 2012 मध्ये फेसबुकने 53 दशलक्ष डॉलर्सचा निव्वळ नफा कमावला. जगभरातून 6 हजार कर्मचारी या फेसबुकमध्ये काम करतात.

मित्रांनो, 10 वर्षांपूर्वी झुकेरबर्ग अवघा 19 वर्षांचा होता, जेव्हा त्याने फेसबुक स्थापन केले. 10 वर्षांत त्याने गगनभरारी घेतली. आज दरमहिन्यास 1.2 अब्ज लोक फेसबुकचा वापर करतात. सन 2012 मध्ये या कंपनीचे मूल्य 104 अब्ज डॉलर्स इतके काढले गेले. स्वत:चे कर्तृत्व अत्यंत कमी वयात ज्यांनी सिद्ध केले त्यात या पाच तरुणांचा नक्कीच समावेश आहे.

त्‍या पाच जणांची छायाचित्रे बघा, पुढील स्‍लाइडवर..