आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज: बारामतीतच टोलमुक्तीचं राष्ट्रवादीचं नाटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महायुतीने राज्य टोलमुक्तीची घोषणा करून मतदारराजाच्या काळजाला हात घालत संपूर्ण राज्यभर टोलमुक्तीसाठी आंदोलने तोडफोड, जाळपोळ केली. त्यामुळे वर्षभरापूर्वी टोलची तोडफोड करून यार्डात विश्रांती घेणारे मनसेच्या रेल्वे इंजिनाने शिटी मारून टोलमुक्तीसाठी वेग पकडला. त्याचा परिणाम बारामतीवरही झाला. अचानक महायुतीच्या टोलमुक्तीच्या घोषणेने बारामतीत टोल लादणार्‍या राष्ट्रवादी कॉँग्रेसने टोलमुक्तीच्या लढ्यात उतरून विरोधकांअगोदर टोलमुक्तीसाठी मोर्चा काढल्याने नागरिकांनी तोंडात बोटे घातली. त्यांच्या टोलविरोधी घोषणा ऐकून नागरिकांनी कानावर हात ठेवले. एकाच मोर्चानंतर राष्ट्रवादीचा टोलविरोध थंडावला. तर, विरोधकांचा पार्टटाइम टोलविरोध नागरिकांना 2006 पासून बारामतीत येण्या-जाण्यासाठी दुहेरी बेकायदेशीर टोलमधून अजूनही मुक्ती देऊ शकला नाही. त्याचे टोलमुक्ती घोषणेचे प्रतिध्वनी काही तासांपुरते हवेत राहिले. महायुती, मनसेचे बहुतांशी पदाधिकारी वकील मंडळी असल्याने टोलविरोधाच्या आंदोलनाचे रूपांतर टोल तोडफोडीत होऊन न्यायालयाच्या चकरा नको. असा पवित्रा घेऊन. फक्त टोलनाक्यावर जायचे घोषणा द्यायच्या अटक करून प्रतीबंधात्मक कारवाई झाल्यानंतर पुन्हा आपला व्यवसाय भला... ही विरोधकांची भूमिका सत्ताधार्‍यांच्या पथ्यावर पडली आहे. आमच्या गाडीचा टोल घेतला जात नाही ... अशी विरोधकांनीच चारचौघात मतं मांडली पण बारामतीकर व बारामतीला येणार्‍या सर्वसामान्य लोकांची टोलमधून कधी सुटका होणार..

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, भाजपचा नवा पायंडा