आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tom Holland Selected For Roll Of Spider Man In Next Film

झगडणाऱ्या पित्याचा मुलगा हॉलीवूडमध्ये स्पायडरमॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टॉम हॉलंड, हॉलीवूड अभिनेता


जन्म- १ जून १९९६
आई- निकोला एलिझाबेथ (छायाचित्रकार) आणि डॉमनिक हॉलंड (कॉमेडियन व लेखक), ३ भाऊ
शिक्षण- रोमन कॅथोलिक प्रिपरेटरी, विम्बल्डन कॉलेज सेकंडरी स्कूल, ब्रिटन स्कूल फॉर परफॉर्मिंग आर्टमध्ये शिक्षण
चर्चेत- नवा स्पायडरमॅन म्हणून त्याच्या नावाची अचानक घोषणा
मित्रांमध्ये तो "ममाज बॉय' म्हणून ओळखला जातो. वडिलांना जे साध्य झाले नाही ते त्याने करून दाखवले. वडिलांनी एक्लिप्स शीर्षकाच्या ब्लॉगमध्ये मुलाविषयी भावना व्यक्त केली आहे.
टॉम हॉलंड स्पायडरमॅनच्या व्यक्तिरेखेत भेटणार आहे. या ब्रिटिश कलाकाराने वयाच्या १२ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. त्यासाठी त्याला दोन वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागले. व्हिक्टोरिया पॅलेस थिएटरमध्ये म्युझिकल बिली इलियटच्या सादरीकरणात त्याने टायटल रोलसाठी काम केले होते. यातून त्याला बरीच प्रसिद्धीही मिळाली. त्याचे नृत्य शिक्षण स्वत:च्या गॅरेजमधून सुरू झाले. २०१२ मध्ये त्याचा पहिला चित्रपट द इम्पॉसिबल आला. हा चित्रपट २००४ मध्ये आलेल्या सुनामीवर आधारित होता. या चित्रपटानंतर त्याचे आयुष्य पालटले. मात्र, तरीही त्याने शाळेत खंड पडू दिला नाही.

याआधीचा स्पायडरमॅन अँड्रू गॅरफील्डप्रमाणे तोही लंडनमध्येच वाढला. स्पायडरमॅनच्या व्यक्तिरेखेसाठी १५०० जणांनी ऑडिशन दिली होती, मात्र त्यात टॉमनेच बाजी मारली. त्याचे निकटवर्तीय "ममाज बॉय ' म्हणून संबोधतात. तो प्रत्येक कामासाठी आईवर अवलंबून असतो. टॉमचा लहान भाऊ हॅरीही चित्रपटांत काम करतो. वडील डोमिनिक यांनी २०११ मध्ये लिहिलेल्या ब्लॉगमध्ये टॉमच्या आयुष्यातील काही बाजू नमूद केल्या आहेत.

२०१२ च्या अखेरची घटना आहे. मुलाच्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी डोमिनिक यांना लॉस एंजलिसला जायचे होते. आपण हॉलीवूड प्रवेशासाठी अायुष्यभर झगडलो, मात्र मुलाला लहान वयातच हे यश प्राप्त करण्याचे भाग्य लाभले, अशी त्यांची भावना आहे. विमानात बसण्याआधी मी टॉमचा पिता आहे हे इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांना मी सांगितले होते. डोमिनिक नेहमी इकोनॉमी क्लासमधून प्रवास करत असत. मात्र, टॉममुळे आता त्यांना प्रथम श्रेणीतून प्रवास करण्याची संधी मिळाली. टॉममुळेच आपणास "द इम्पॉसिबल'च्या प्रमुख कलाकारांसोबत रेड कार्पेट सन्मान मिळाला. मी आयुष्यभर लोकांना हसवून घर चालवले. या कार्यक्रमासाठी टॉम आणि तीन मुलांपासूनच प्रेरणा मिळाल्याची भावना डोमिनिक यांची आहे.