आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tourist Spot In Pune District Bhimashankar Jyotirling

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीर्थटनासह पर्यटन: सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण महाराष्‍ट्रला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यातल्या त्यात पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास महाराष्‍ट्र खुप समृद्ध आहे. अष्ठविनायकांसह बारा ज्योतिर्लिंगापैका पाच अवघ्या महाराष्‍ट्रात आहे. 'सह्याद्री'च्या कुशीत वसलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग एक आहे. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरला 'चंद्रभागा' म्हणून ओळखरी जाणारी भीमा नदी शिवलिंगातून प्रकट झाली आहे. त्यामुळे अतिशय घनदाट जंगलात असलेले भीमाशंकर तीर्थक्षेत्र आता महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.

महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असल्याल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात 'भीमाशंकर' हे तीर्थक्षेत्र आहे. शिवशंकर अर्थात महादेवाच्या घामातून भीमा नदी प्रकट झाल्याचा उल्लेख शिवपुराणात आढळतो. भीमा नदी ही दक्षिण-

पश्चिम वाहिणी असून रायपूर जिल्ह्यात ती कृष्णा नदीला मिळते. विशेष म्हणजे पंढरपूरला ती 'चंद्रभागा' म्हणून ओळखली जाते.
भीमाशंकर जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. देशभरातील भाविक आणि पर्यंटक येथे येत असतात. भीमाशंकरचा आजूबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे 1984 मध्ये महाराष्ट्र सरकारचे हा परिसर अभयारण्य म्हणून जाहीर केला होता. भीमाशंकर हे सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले असल्याने हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 3250 फूट उंचीवर आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, 'महादेव शंकराच्या घामातून प्रकट झाली भीमा'