आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘भास्कर रीडर कनेक्ट सेल’: रमेशजी अग्रवाल यांच्या स्मृती जागवण्‍याचा एक विनम्र प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमेशचंद्र अग्रवाल (30 नोव्हेंबर 1944 - 2017) - Divya Marathi
रमेशचंद्र अग्रवाल (30 नोव्हेंबर 1944 - 2017)

दैनिक भास्करचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचा आज जन्मदिन. आज ते आपल्यात नाहीत. रमेशजी नेहमी म्हणत की, ‘भास्कर’चा खरा मालक वाचक आहे आणि तोच कायम मालक राहील. त्यांचे हेच विचार घेऊन वाटचाल करत भास्कर समूह माध्यम जगतात नवा प्रारंभ करत आहे. आज त्यांच्या जन्मदिनी आम्ही ‘भास्कर रीडर कनेक्ट सेल’ची स्थापना करत आहोत. या अंतर्गत भास्करचा प्रत्येक वाचक, परिवार आपल्या अपेक्षा आणि सूचना थेट माझ्यापर्यंत पोहोचवू शकेल. तुमच्याकडून आलेली प्रत्येक सूचना आणि अपेक्षा आम्ही संपूर्ण जबाबदारीने जाणून घेऊ आणि ‘वाचकच भास्करचा खरा मालक आहे,’ हा रमेशजींचा संकल्प घेऊन वाटचाल करत शक्य तो निर्णय घेऊ. 


तुम्ही आम्हाला 9292929291 या मोबाइल क्रमांकावर SMS किंवा व्हाॅट्सअॅप पाठवू शकता किंवा mdconnect@dbcorp.in वर ई-मेल करू शकता. तसेच खालील पत्त्यावर पत्रही पाठवू शकता- 
भास्कर रीडर कनेक्ट सेल 
दैनिक भास्कर कार्यालय, ६, प्रेस कॉम्प्लेक्स, एमपी नगर, झोन-१, 
भोपाळ-४६२०११ (मप्र) 
सुधीर अग्रवाल 
प्रबंध संचालक 

 

आवाहन - कृपया प्रसिद्धि पत्रके, लेख, बातम्या किंवा वैयक्तिक समस्या यावर पाठवू नयेत. 

बातम्या आणखी आहेत...