आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल्कनीचे रंगरूप बदलण्‍याच्या युक्त्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बाल्कनीकडे घराचा बाहेरचा भाग म्हणून दुर्लक्ष करण्यात येते. मात्र, याच जागेवर घरातील सर्व जण एकत्र बसून गप्पाटप्पा करतात. वर्तमानपत्रासह दिवसाचा आरंभ करतात. सायंकाळी एकत्र येऊन दिवसभराच्या गप्पा आणि इव्हिनिंग स्नॅक्सचा आनंदही लुटतात. ऋतुबदलानुसार बाल्कनीची सजावट करून ती घरातील सर्वाधिक सुंदर जागा बनवणे अगदी सोपे आहे. बाल्कनीचे रंगरूप बदलण्याच्या काही युक्त्या जाणून घेऊया...

स्टेप-1। सजावट करण्यापूर्वी ऋतू, थीम किंवा डिझाइनपैकी एक निवडा आणि त्यानुसारच सजावटीचे साहित्य खरेदी करा. उदाहरणार्थ उन्हाळ्यात बाल्कनीत फुलांची सजावट करता येईल. हिवाळ्यात येथे झाडे लावण्याऐवजी त्याचे सीटिंग एरियात रूपांतर करावी. येथे बसून सर्वांना कोवळ्या उन्हाचा आनंद लुटता येईल. खुर्ची, मेज किंवा सोफा ठेवून लाउंज अ‍ॅरेंजमेंटही आपण करू शकतो. त्यातून आपल्याला कल्पकता दाखवण्याची संधी मिळेल.
स्टेप-2। सजावटीपूर्वी बाल्कनी अगदी स्वच्छ करून घ्या. नंतर सजावट कुठे व कशी करावी लागेल याचा विचार करा. बाल्कनीतील पसारा कमी करा. भिंती स्वच्छ करायलाही विसरू नका. स्वच्छ बाल्कनीची सजावट करायला मजा येईल.
स्टेप-3। बाल्कनीचा आनंद लुटण्यासाठी बैठक व्यवस्था आरामदायी असावी. घरातील सर्वांना बाहेर बसावेसे वाटण्यासाठी सीटिंग अ‍ॅरेंजमेंटची निवड विचारपूर्वक करा. स्नॅक्स व इतर वस्तू ठेवण्यासाठी साइड टेबल ठेवा. या टेबलवर सजावटीच्या वस्तूही ठेवता येतील. मेटल व वुड डेकोरेशन आयटम खराब होण्याची शक्यता कमीच असते.
स्टेप-4। सजावटीची सुरुवात मोठ्या वस्तूंपासून करा. सर्वात आधी फर्निचर लावून घ्या. उदाहरणार्थ टेबल, सिटिंग अ‍ॅरेंजमेंट ठेवल्यानंतर छोट्या अ‍ॅसेसरी ठेवा. लहान वस्तू आपल्या मर्जी व मूडनुसार कुठेही ठेवता येतात.
स्टेप-5। सजावटीचे साहित्य घेण्यासाठी होम इम्प्रूव्हमेंट स्टोअरमधून महागड्या वस्तू विकत घेण्याची आवश्यकता नाही. एथनिक लूकसाठी मातीच्या वस्तू वापरा. यूथफुल किंवा फंकी लूकसाठी रंगीबेरंगी खुर्ची, मेजवर फॅशनेबल वस्तू, निऑन रंगाचे दिवे आणि इतर वस्तू ठेवता येतील.