आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांनी दिली गोऱ्या राष्ट्रवादाला फोडणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टनच्या व्यापारी भागामध्ये रोनाल्ड रिगन इमारतीत आठव्या मजल्यावर रात्रीच्या जेवणादरम्यान भाषण सुरू असताना रंगभेदी टिका ऐकू येते. गोऱ्या राष्ट्रवाद्यांच्या बैठकीऐवजी लग्नाचे रिसेप्शन वाटू लागते. युरोपियन लोकांच्या प्रगतीसाठी समर्पित अर्लिंगटनस्थित थिंक टँक नॅशनल पॉलिसी इन्स्टिट्यूटने (एनपीआय)बैठकीचे आयोजन केले होते. एनपीआय- रंगभेदाने येतो बुद्धीमध्ये फरक, अशा आशयाचे लेख प्रकाशित करते. रेडिक्स जर्नल ब्लॉग चालवते. त्यावर माझा ग्रुप तुमच्या तिरस्कारी ग्रुपपेक्षा वेगळा आहे, यासारखे ब्लॉग टाकले जातात. ते वेगळ्या प्रकारचे राजकारण करतात. त्यांनी दक्षिण पंथीयांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उदयाचा अर्थ, या विषयावर चर्चा आयोजित केली होती.
अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकीच्या अभियानाच्या सुरुवातीनंतर ट्रम्प यांनी खूप समर्थक जमवले. भारदस्त व्यक्तिमत्त्व रिपब्लिकन पक्षाच्या सिद्धांतांना आव्हान देण्याची इच्छा प्रदर्शित करून मतदारांना त्यांनी आकर्षित केले असून ते गोऱ्या राष्ट्रवाद्यांचे हीरो म्हणून पुढे आले आहेत. तसे पाहता रंगभेदाव्यतिरिक्त अन्य कारणांनी बहुतांश लोक त्यांच्यासोबत जोडले आहेत. एनपीआयचे अध्यक्ष रिचर्ड स्पेंसर म्हणतात, ट्रम्प यांनी आमच्यात जोश जागवला आहे. १९६८ मध्ये जॉर्ज वॉलेस यांच्यानंतर पहिल्यांदा अमेरिकेत दक्षिणपंथी विचारक मुख्यधारेतील राजकारणाच्या दिशेने अग्रेसर झाले आहेत. रॅलीमध्ये ते सहभागी होत आहेत.

रंगभेद समर्थक अतिवादी ट्रम्प यांच्याशी जोडले आहेत. स्पेंसर सांगतात, एका वर्षात एनपीआयच्या आयोजनामध्ये ७५ टक्के उपस्थिती वाढली आहे. गोऱ्यांच्या श्रेष्ठत्वाचे समर्थन करणारी वेबसाइट स्टॉर्मफ्रंटने ट्रम्प यांच्याकडील वाढता आेघ पाहता आपले सर्व्हर अपग्रेड केले आहे. रंगभेदी अमेरिकन फ्रीडम पार्टीचे चेअरमन विलियम जॉन्सन यांनी सहा राज्यांच्या प्राथमिक निवडणुकीत ट्रम्प समर्थकांच्या अभियानाचा खर्च उचलला आहे. ते सांगतात, पार्टीची सदस्यता वाढली आहे. त्यांच्या मतानुसार त्यांना ट्रम्पसारख्या चिनगारीची गरज होती. असंतुष्ट गोऱ्यांमध्ये ट्रम्प यांच्या यशाचे संकेत मिळत आहेत की, युरोपमध्ये दक्षिणपंथी पार्टीच्या उदयाला हवा देणारी राष्ट्रवादी आणि विदेशींच्या खोट्या भीतीबाबत प्रचार करणाऱ्यांची ताकद अमेरिकेमध्ये वाढत आहे. अशा रंगभेदाच्या वातावरणामध्ये ट्रम्प यांच्या राजकीय भाषणांनी एक वेगळीच मर्यादा आखून दिली आहे. अतिवादी शक्तींना देशाच्या दक्षिण सीमेवर मजबूत भिंत तयार करून मुसलमानांचा आवाज बंद करण्याची अपील ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांची ही राजनीती अनेकांना चांगली वाटत आहे. अमेरिकेतील आजच्या स्थितीमध्ये कमी येत असल्याची त्यांची गोष्ट लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणासोबत जोडल्या जात आहे.

अतिवादी लोकांना आशा आहे की, एक शक्तिशाली सर्वव्यापी संदेशवाहक त्यांच्या विचारांचा प्रसार करू शकतो. मेरीलँड निवासी २० वर्षीय रिचर्ड या युवकांच्या मते, ट्रम्प यांनी देशात अमेरिकी राष्ट्रवाद नव्हे तर गोऱ्या वंशवादी राष्ट्रवादाचे दरवाजे खुले केले आहेत. हे दरवाजे उघडल्यानंतर बंद करणे कठीण होणार आहे.

ट्रम्प यांचा उदय धूर दक्षिणपंथीय लोकांसाठी परिवर्तनाची एक संधी आहे. एनपीआईच्या स्पेेंसरप्रमाणे नव्या पिढीचे नेते राष्ट्रवादाला २१ व्या शतकाच्या आंदोलनाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. एनपीआईच्या बैठकीमध्ये ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे युवक जास्त प्रमाणात सहभागी होत आहेत. अनेक लाेकांनी संागितले की, एक ऑनलाइन नेटवर्क एल्ट राइट, पर्यायाप्रमाणे एक भाग आहे. एल्ट राइट ट्रम्प समर्थक सेनेच्या रूपामध्ये मोठी होत आहे. ते ट्विटवरवर भडकावू आणि फॅसिस्टवादी संदेश प्रसारित करत आहे.

कोणत्याही इतर आंदोलनाप्रमाणे एल्ट राइटनेही आपली एक शब्दावली तयारी केली आहे. ते रंगभेदी विरोधकांची टर उडवतात. ते अधिकांश रिपब्लिकन नेत्यांना यहुदी कळसूत्री बाहुल्या मानतात, ज्या स्वस्त काम करणाऱ्या कारखानदारांचे गुलाम आहेत. ते विविधतेच्या फायद्याला खारीज करतात. लोकसंख्येतील वाढत्या प्रमाणालाही धोकादायक समजतात. एनपीआईच्या बैठकीमध्ये गोऱ्या राष्ट्रवाद्यांनी अमेरिकेतील लोकसंख्येत होत असलेल्या बदलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. लुईसियानाच्या २७ वर्षीय साबण विक्रेता जेफ्री यांचे म्हणणे आहे की, लोकशाहीमध्ये बहुमताचे शासन असते. जर आम्ही आमच्याच देशामध्ये अल्पसंख्य झालो तर आमचे अधिकार काढून घेतले जातील. जर गोऱ्या लोकांच्या जन्मदर कमी राहिला तर बाहेरच्या लोकांचे येणे थांबणार नाही, त्यांच्या जुुुलमास आम्ही बळू पडू.

निवडणूक सभेत हिंसा, वर्णभेदी घोषणाबाजी
निवडणूकअभियानात दहशतवाद्यांनी शिरकाव केल्याने वातावरण दूषित झाले आहे. अलबामा ते नेवादापर्यंत ट्रम्पच्या रॅलीमध्ये वर्णभेदाच्या घोषणा ऐकावयास मिळाल्या. ओहिओ, मिसौरीमध्ये त्यांच्या समर्थकांनी विरोधकांना आफ्रिका आणि ऑशविट्ज जाण्याविषयी घोषणा दिल्या. ट्रम्पच्या आयोजनांमध्ये वर्णभेदी हिंसेचे दर्शन घडले आहे. केंटुकीमधील एका कार्यक्रमात गोऱ्या नेत्याने एका श्वेतवर्णीय युवतीशी अशोभनीय वर्तन केले. शिकागोमध्ये ब्लॅक लाइव्हज मॅटर आंदोलनामुळे कार्यकर्ते ट्रम्प समर्थकांमध्ये तूतू-मैमै झाल्याने एक रॅली रद्द करावी लागली.

गोऱ्यांशीही भेदभाव आणि अत्याचार?
याघटनांमागे ट्रम्प किती दोषी आहेत हा किचकट प्रश्न आहे. त्यांनी आपल्या निवडणूक मोहिमेत कधीही गोऱ्यांची सर्वोच्चता वर्णभेदाला महत्त्व दिले नाही. त्यांनी मुस्लिमांवर प्रतिबंध मेक्सिकोहून आलेल्या नागरिकांचा बलात्कार, हिंसा घडवण्यात सहभाग असल्याचे दर्शवल्यानंतरही त्यांनी दोन्ही समूहांची प्रशंसा केली. जनक्षोभ निर्माण करणाऱ्या घटना घडल्यानंतरही त्यांनी त्याबाबत टीका केली नाही. केलीच तरी उशिरा केली.

ट्रम्प यांचे संकेत, अतिवाद्यांचा विश्वास वाढला
गोऱ्याराष्ट्रवाद्यांना मते, ट्रम्प यांनी संकेतांच्या माध्यमातून त्यांचा पाठिंबा मिळवला आहे. ट्रम्प यांनी ट्विटरवरील आपल्या ७५ लाख फॉलोअर्सला आपल्या वर्णभेदी प्रशंसकांचा मॅसेज रिट्विट केले आहे. त्यांच्या स्टाफमधील काही सदस्य वर्णभेदी टीकाटिप्पणीचे एल्ट राईट समर्थकांचे ट्विट फॉलो करतात. वर्णभेदाचे समर्थन करणारे संकेतस्थळ डेली स्टॉर्मरचे संपादक अॅण्ड्रयू एंगलिनच्या मतानुसार, ट्रम्प एक नवे श्वेतसमर्थक पुलाचे प्रतिनिधित्व करतात.