आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धरणातून बोगद्याद्वारे पाणी वाहून नेणारी ६१ वर्षांपूर्वीची यंत्रणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्तुगालमधील कोवओ डू कोंचो येथे रिबेरा धरण आहे. उंचावर असल्याने येथील पाणी दीड किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या धरणात पोहोचवणे अवघड होते. तेथून कालवा बांधणेही कठीण होते. त्यामुळे रिबेरा धरणाचे पाणी लाभक्षेत्रापर्यंत पोहोचवण्यासाठी १९५५ मध्ये धरणात मोठमोठे पाषाण फोडून १५०० मीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला. हे छायाचित्र रिबेरा धरणातील भुयाराचे आहे. येथूनच पाणी जमिनीखाली नेण्यात येते आणि पुढे भुयाराद्वारे लागोआ धरणापर्यंत पोहोचते.
- पाण्याची मागणी आणि पुरवठा यांमधील संतुलन राखण्यासाठी पाषाणांद्वारे तयार करण्यात आलेली ही यंत्रणा यशस्वी झाली. ही दोन्ही धरणे औष्णिक विद्युत प्रकल्पाचा भाग आहेत. वरून पाहिले असता हे लहान धबधबे असल्याचा भास होतो. आजूबाजूच्या टेकड्यांवरून येणाऱ्या लहान नद्यांचे पाणीही या धरणाला येऊन मिळते.
}viagensasolta.com
बातम्या आणखी आहेत...