आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Turning Point In Life : An American Company Give Chance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टर्निंग पॉइन्ट: अमेरिकन कंपनी इंगरसोलमधून मिळाली करिअरची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या 17व्या वर्षी पदवी शिक्षणासाठी चांडलिया अमेरिकेत गेले होते. 19 व्या वर्षी पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी एक एफएमसीजी कंपनी सुरू केली; परंतु ही कंपनी लवकरच बंद पडली. 2002 मध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे अमेरिकेतील इंगरसोल कंपनीत विलीनीकरण आणि संपादन कार्यकारी पदावर त्यांची निवड झाली. यालाच ते आपल्या करिअरमधील सर्वात मोठा ब्रेक मानतात. एका वर्षातच चांडलिया ग्लोबल बिझनेसचे मार्केटिंग व्यवस्थापक, तर 24 व्या वर्षी कंपनीचे सर्वात तरुण सरव्यवस्थापक बनले.

इगोन जेंडर कंपनीकडून प्रस्ताव आला आणि सिंगापूर गेले
2009 मध्ये सिंगापूरच्या इगोन जेंडर या कर्मचार्‍यांची भरती करणार्‍या कंपनीकडून त्यांना नोकरीचा प्रस्ताव मिळाला आणि ते नवीन कंपनीत रुजू झाले. येथे त्यांच्यावर आशिया-पॅसिफिक मधील हवाई क्षेत्राची जबाबदारी होती. इगोन जेंडरमध्ये एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी मैत्री झाली

याचदरम्यान चांडलिया यांची एअर एशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत भेट झाली. आणि भेटीचे रूपांतर हळूहळू गाढ मैत्रीत झाले. त्यांच्यापैकीच एका अधिकार्‍याने चांडलिया यांचे नाव एअर एशियाचे व्यवस्थापकीय संचालक टोनी फर्नांडिस यांना सुचवले.

मार्चमध्ये फर्नांडिस यांच्यासोबतची पहिली बैठक चालली 25 मिनिटे
यावर्षी मार्चमध्ये चांडलिया आणि फर्नांडिस यांच्यादरम्यान 25 मिनिटांची एक बैठक झाली. काही वेळेतच दोघांचे चांगले ट्यूनिंग जमले. टोनीने त्यांना राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सांभाळण्यास सांगितले.पण हे खूप लहान काम असून माझी स्वप्ने खूप मोठी असल्याचे सांगत चांडलिया यांनी नकार दिला. त्यांना वैश्विक पातळीवर काम करायचे होते. एखादी मोठी योजना असल्यास नक्की काम करू, असे चांडलिया यांनी त्या वेळी सांगितले. त्यांच्या याच विचारधारेमुळे टोनी यांनी शेवटी त्यांच्यासमोर सीईओपदाचा प्रस्ताव ठेवला. गर्भवती पत्नीस सिंगापूरमध्ये एकटी सोडून भारतात येण्याची चांडलिया यांची इच्छा नव्हती. हेसुद्धा नकाराचे एक कारण होते.

दहा दिवसांनंतर दुसरी बैठक
बैठकीनंतर काही दिवसांतच टोनी यांनी चांडलिया यांना पुन्हा बोलावले. चांडलिया यांची पत्नी वयाने त्यांच्यापेक्षा मोठी आहे पत्नीच्या सल्यावरून चांडलिया भारतात आले. एअर एशियामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले.

( मिठ्ठू चांडलिया यांच्याशी नेहा दुसा यांनी केलेली बातचीत. भारतीय भाषेतील प्रसारमाध्यमात चांडलिया यांनी दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे.)