आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचाराच्या दुष्टचक्रातून टीव्ही कधी बाहेर येणार?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचबीओच्या ‘बोर्डवॉक एम्पायर’ कार्यक्रमात जिप रोसेटी शहराच्या पोलिस अधिकार्‍यावर पेट्रोल ओतत त्याला पेटवून देतो. कारण फक्त इतकेच की, ‘गुड लक’ म्हणण्याची अधिकार्‍याची शैली त्याला आवडत नाही. एफएक्सच्या ‘सन्स ऑफ एनार्की’त एक गुंड आपल्या प्रतिस्पर्धाच्या मुलीला त्याच्या डोळ्यादेखत जाळतो. हे काही छोटे-मोठे उदाहरण नाही, जवळपास प्रत्येक टीव्ही वाहिनीवर हिंसाचार आणि खून त्यांच्या कार्यक्रमांचा महत्त्वाचा भाग बनत चालले आहेत. अनेकदा गंभीर स्वरूपाच्या कार्यक्रमातही हिंसाचार तार्किक स्वरूपात सादर केला जातो.

कदाचित, निर्मात्यांना असे वाटतेय की, प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात सोपी आणि योग्य पद्धत हीच आहे. टीव्ही लोकांना हिंसेची प्रेरणा देतो का? याचे उत्तर शोधण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, जपान आणि इंग्लंडमध्येही अशा प्रकारचे कार्यक्रम तयार करून दाखवले जातात; परंतु अमेरिकेच्या तुलनेत या देशात हत्यांचे प्रमाण कमी आहे. एचबीओच्या क्राइम शो ‘द वेअरहाऊस’चे निर्माते डेव्हिड सायमन सांगतात, वास्तविक जीवनात टीव्ही कार्यक्रम हत्यांसारख्या घटनांना प्रोत्साहन देतात, असा विचार करणेही मूर्खपणा आहे. परंतु ते एक संदेश देतात.

हे करमणुकीपेक्षाही वरचढ आहे. हे त्या सामूहिक भयाचे चित्रण आहे ज्याचे सावट आपल्या सार्‍यांवर असते. सर्वसाधारण धारणांविरुद्ध हिंसाचार आणि हाणामारी असणारे कार्यक्रम सामान्यांना अधिक आवडतात. द वॉकिंग डेड, स्टोजी, मिडल ऑफ द रोड यासारख्या शोजचा समावेश अनेक वर्षांपासून पाहिल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये केला जातो. टीव्ही कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणावर बीभत्स असण्याचे मोठे कारण सीमांचे तुटणे आहे. चित्रपटांप्रमाणेच टीव्ही कार्यक्रमांचे निर्माते आता भाषांच्या सीमांमध्ये बांधलेले नाहीत. त्यांना आपल्या प्रमुख पात्राला आदर्श आणि सर्वांच्या आवडीचा बनवण्याचे बंधन असत नाही आणि नियमांचे बंधन आता भूतकाळातील बाब झाली आहे. परंतु सर्वात मोठे कारण हे आहे की, निर्मात्यांना हे लक्षात ठेवावे लागते की, प्रेक्षक, खासकरून तरुण पिढी जाहिरातदारांना का पैसे देते? जीवन आणि मृत्यूदरम्यानचा संघर्ष सुरू आहे तिथे तरुणांचे लक्ष अनायासेच खेचले जाते. टीव्ही हिंसाचाराला कलात्मक पद्धतीने सादर करण्यात सक्षम आहे यात कोणतीही शंका नाही.

मालिकांमध्ये दाखवल्या जाणार्‍या हिंसाचाराचा परिणाम मालिका संपल्यावरही काही काळापर्यंत कायम राहतो. टीव्हीच्या नवीन सुवर्णयुगाने आपल्याला असे कार्यक्रम दिलेत ज्यांचा 20 वर्षांपूर्वी विचारही केला गेला नाही. परंतु यात अद्यापही परिपक्व नाट्यासाठी संधी नाही ज्यात हिंसाचाराला जागाच नसेल. हलक्या-फुलक्या करमणूक करणार्‍या ‘सोप ऑपेरा’ आतापर्यंत याचा भागच बनू शकल्या नाहीत. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, कधीपर्यंत टीव्हीदेखील कादंबरी आणि इतर चित्रपटांप्रमाणे आपल्या विषयांचा विस्तार करण्यात यशस्वी होईल? याची गरज आहे आणि मागणीही. परंतु, वास्तवात असे कधी घडेल? याचे उत्तर देणे कठीण आहे.