आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्विटरच्या मालकाचेच खाते गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियामध्ये सध्या ट्विटर हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक विचित्रच घटना घडली. कंपनीचे मालक व सीईओ जॅक डोर्से यांचे ट्विटर खाते डिलीट झाले. हे नेमके का झाले, याची माहिती कंपनीतील कोणत्याही कर्मचाऱ्याला नव्हती. काही वेळेनंतर तंत्रज्ञांच्या टीमने दुरुस्ती केली व डोर्से यांची प्रोफाइल पूर्ववत झाली.
खाते सुरळीत झाल्यावर जॅक म्हणाले की, अंतर्गत त्रुटी दूर करण्यासाठी माझे खाते काही काळ बंद ठेवण्यात आले होते. आता सर्व सुरळीत आहे. त्यांचे हे स्पष्टीकरण सात तासांत १९ हजारांहून अधिक वेळा रिट्विट झाले तसेच त्याला ३१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या.
अनेर युजर्सनी जॅक यांना तक्रारी पाठवल्या होत्या, तर काहींनी जॅक यांच्यावर टीकाही केली होती. यापूर्वी किती युजर्सचे खाते कंपनीने बंद केले आहे, असा सवालही त्यांना विचारण्यात आला.
- जॅक डोर्से हे ट्विटरचे संस्थापक सदस्य आहेत. यापूर्वी २००८ मध्ये कंपनीने त्यांना सीईओ पदावरून बरखास्त केले होते. गेल्या वर्षी त्यांना पुन्हा बोलावण्यात आले. यावर्षी ट्विटरला खूप नुकसान सहन करावे लागले.
बातम्या आणखी आहेत...