आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बरेच काही सांगते ट्विटरची भाषा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक ट्विट म्हणजे केवळ 140 शब्द नव्हेत. रोज पाठवल्या जाणार्‍या 50 कोटी ट्विटर संदेशांमध्ये अनेक वाक्प्रचार, गमती-जमती तसेच भावना दडलेल्या असतात. त्यामध्ये हॅशटॅग्स, इमोटिकान्स आणि लिंक्सदेखील असतात. अनेक ट्विट्समध्ये माणसाचे स्थान दर्शवणारे जिओटॅग्स असतात.
भाषेबाबत संशोधन करणार्‍यांसाठी ट्विटरने बरीच माहिती दिली आहे. काही विद्वान अमेरिका आणि युरोपमध्ये सात वर्षे जुन्या मायक्रोब्लॉगिंग साइटच्या लाखो उदाहरणांवर अभ्यास करत आहेत. व्होक्यॅब्युलरी डॉट कॉमचे कार्यकारी निर्माता बेन जिमर सांगतात की, एकाच वेळी इतक्या लोकांचे संदेश आणि माहिती उपलब्ध होणे असामान्य आहे. ट्विटद्वारे आपला परिचय आटोपशीर वाक्यांत मांडण्याची कला शिकायला मिळते. त्यात वाक्प्रचारांच्या प्रसारासारख्या अनेक रहस्यांचे पुरावेही मिळाले आहेत. संवादाचे एक नवे माध्यम म्हणून ते समोर आले आहे. ट्विटरवर सांगितल्या जाणार्‍या गोष्टी विद्वान, संशोधक, वैज्ञानिक, मोहीम चालवणार्‍यांसाठी महत्त्वाच्या ठरतात. जॉर्जिया टेकमध्ये संगणक भाषातज्ज्ञ असलेले जेकब आइन्स्टाइन म्हणतात, भाषा संस्कृती, समूह समजण्याची संधी देते. यात सक्रिय व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत ट्विटरवर आधारित 150 संशोधने 2013 मध्ये झाली आहेत. महिलांद्वारे ‘मी आणि माझे’ यांसारखे प्रथम पुरुषी उल्लेख आणि उद्गारवाचक चिन्हांचा वापर करण्याची शक्यता अधिक असल्याचे भाषातज्ज्ञांना आढळले आहे. पुरुष सर्वाधिक लिंक शेअर करतात. ते तंत्रज्ञानासंबंधी शब्दांचाही भरपूर उपयोग करतात.
स्टेनफोर्ड विद्यापीठातील एका भाषातज्ज्ञाला आढळले की, प्रौढ व्यक्ती ट्विटरऐवजी इमोटिकान्सचा वापर करतात. ही सवय परंपरागत भाषेच्या आवडीशी निगडित आहे. युवा ट्विटर शिव्या अधिक लिहितात. ट्वेंटे विद्यापीठाच्या डच संशोधकाला आढळले की, तरुण ट्विटर कॅपिटल शब्द अधिक लिहितात. ते अनेक शब्दांना विनाकारण वाढवतात. प्रौढ व्यक्ती गुड मॉर्निंग, टेक केअरसारखे संदेश वापरतात, तर तरुण लांबलचक ट्विट, अलंकारांचा वापर करतात.
ट्विटची भाषा भौगोलिक स्थिती, उत्पन्न आणि वंशाचा संकेत देते. एका संशोधनात स्पष्ट झाले आहे की, अद्भुत शब्द असलेले ट्विट समृद्ध समूहांचे लोक वापरतात. आयकेआर (आय नो, राइट) शब्द अमेरिकेच्या डेट्रॉइट भागात वापरतात. विज्ञान, तंत्रज्ञान ग्रुप मित्रे कॉर्पोरेशनने ट्विटच्या आधारे व्यक्तीचे लिंग ओळखणारी प्रणाली विकसित केली आहे. कार्नेगी मेलोनचे प्राध्यापक नोह स्मिथ यांनी आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी ट्विटरचा उपयोग केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही स्वत: सगळे ट्विट वाचू शकत नाही; परंतु त्याच्या आधारे सर्व संगणकीय प्रोग्राम लिहिला जाऊ शकतो. स्मिथ आणि आइन्स्टाइनची टीम ट्विटरच्या मदतीने अमेरिकेचा असा नकाशा तयार करत आहे की, जो शब्दांचे स्थान आणि वंशाची माहिती देईल. उदाहरणार्थ, मिस शब्दाचा वापर जॅक्सन आणि मेफिसमध्ये होतो. या दोन्ही ठिकाणी कृष्णवर्णीय मोठय़ा संख्येने राहतात. हा शब्द गोर्‍यांची लोकसंख्या जास्त असणार्‍या नॅशविलमधून आलेला नाही. ट्विटर्स या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत की, त्यांच्या संदेशांची कुठे तरी तपासणी होऊ शकते. स्मिथचे म्हणणे आहे की, ट्विटर्सना हे माहीत नसते की कुणी तरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे. एक आणखी अडचण अशी आहे की, ट्विटरवर लोक अशा प्रकारे लिहितात की, जणू काही त्यांनी पूर्वी कधीच लिहिलेले नाही. त्यामुळे कार्नेगी मेलोनच्या संशोधकांनी स्वयंचलित टॅगर बनवले आहे, जे सामान्य इंग्रजी शब्दांव्यतिरिक्त लिहिल्या गेलेल्या शब्दांना ओळखू शकते. आइन्स्टाइन म्हणतात, सोशल मीडियामुळे लोकांमध्ये होणारे अनौपचारिक संवाद लेखी स्वरूपात सादर केले जात आहेत. यामुळे एक नवीन भाषा आणि त्याचे मूल्य समोर आले आहे.

ट्विटर संदेशांचे जग
प्रौढ ट्विटर्स अधिक प्रमाणावर हॅशटॅगचा वापर करतात.
पुरुषांऐवजी महिलांशी जास्त संपर्क करणारी महिला ट्विटर हॅशटॅगपासून सावध राहते.
मागील दोन वर्षांत ट्विट्सची संख्या दुपटीने वाढली आहे. दररोज 50 कोटी ट्विट्स केले जातात.
तरुण ट्विटर्स अनेकदा लांबलचक शब्दांचा वापर करताना आढळतात.