आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहासनासाठी दोन कुटुंबांचे डावपेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिपब्लिकन पार्टीचे जेब बुश आणि डेमाेक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन नोकऱ्या आणि अर्थकारणाच्या मुद्यावरून एकमेकांना आव्हान देत आहेत. तिकडे, जुलैच्या सर्वात उकाडा असलेल्या दिवशी डलासमध्ये जॉर्ज बुश आणि बिल क्लिंटन २०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत बोलत होते. दोन्हीही माजी राष्ट्राध्यक्ष बुश प्रेसिडेन्शियल सेंटरच्या कार्यक्रमात एकाच मंचावर होते. यावेळी त्यांच्यासोबत फोटो पाहून काही लोक आश्चर्यचकित होतील. कारण, अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा क्लिंटन किंवा बुश यांनाच उमेदवारी मिळेल का, येथे चांगले उमेदवारच नाहीत का, असा प्रश्न मतदार मोठ्या प्रमाणावर विचारत आहेत.
डलासमध्ये टाइमच्या गप्पांदरम्यान त्यांचा आपसातील ताळमेळ लक्षात आला. क्लिंटन म्हणतात, लोक आम्हाला चर्चा करताना किंवा सहमती दर्शवताना एकत्र पाहू इच्छित नाही. येणाऱ्या महिन्यांमध्ये जेव्हा राजकारण दोघांना वेगळे करेल आणि परिस्थिती त्यांना जवळ आणेल तेव्हा ते कसे वागतील? २००८ मध्ये हिलरी क्लिंटन यांना डेमाेक्रॅटिक पार्टीकडून निवडून आणण्यात पती बिल क्लिंटन यशस्वी झाले नाहीत. आता त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. बुश यांच्यासाठी ही पहिली संधी असेल. त्यांचे बंधू जेब रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराच्या शर्यतीत आहेत.

जॉर्ज बुश दोनदा राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांचे वडील सीनियर बुश एकदा निवडून आले होते. बिल क्लिंटन दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होते. या अनुभवातून ते अंदाज बांधू शकतात की पुढे काय होणार आहे. बुश म्हणतात, मी नाही सांगू शकत की कोण जिंकेल, पण काय होणार आहे हे मी सांगू शकतो. क्लिंटन सकारात्मकपणे मान हलवतात. ते म्हणतात, काही गोष्टी कायम होतात. मात्र, स्वत:च्या पक्षाचे जोरदार नेतृत्व करणारीच व्यक्ती उमेदवार बनू शकेल.

पदत्यागानंतर क्लिंटन आणि बुश यांना इतिहास जमा व्हायचे होते. त्यावेळी क्लिंटन ५४ आणि बुश ६२ वर्षांचे होते. त्यांच्याकडे खूप वेळ होता. हिलरी यांची सिनेटरपदी निवड झाल्यानंतर बिल यांनी जगभरात मोठ्या रकमेच्या फीच्या विरोधात भाषण द्यायला सुरुवात केली. २००१मध्ये स्वत:चे फाउंडेशन बनवले. २०१२मध्ये डेमोक्रॅटिक पार्टीच्या संमेलनात क्लिंटनच्या भाषणाने उपस्थितांमध्ये जोश भरला. त्यापासून प्रभावित झालेल्या ओबामा यांनी त्यांना "सेक्रेटरी ऑफ एक्सप्लेनिंग स्टफ" बनवले. २०१२मधील निवडणुकांदरम्यान न्यूयॉर्क टाइम्सची हेडलाइन होती, बिल क्लिंटन इज श्योर विनर. (बिल क्लिंटनच जिंकणार)

क्लिंटन आपल्या फाउंडेशनच्या घडामोडींचा बचाव करतात. फाउंडेशनचे म्हणणे आहे, त्यांनी त्यांच्या तीन लाख दानशूर व्यक्तींची नावे सांगितली आहेत. दानाच्या सर्व पैशांचा हिशेबही दिला आहे. तसे फाउंडेशनच्या कॅनेडियन भागीदाराला देण्यात आलेले दान गोपनीय ठेवण्यात आले आहे. क्लिंटन यांच्या तुलनेत बुश यांची लोकप्रियता कमी आहे. मात्र, या उन्हाळ्यात पहिल्यांदा बुश यांना पसंत करणाऱ्या लोकांची संख्या त्यांना नापसंत करणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा जास्त होती.

सर्वाधिक अमेरिकन आणि काही रिपब्लिकन दावेदार इराक युद्धाला एक चूक मानतात. तरीसुद्धा, आयएसआयएसच्या भयानक कारवायांनी बुश यांच्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले. बुश यांनी युद्धात जखमी सैनिकांच्या मदतीसाठी काही कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यांनी गेल्या उन्हाळ्यात जेबला निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा सल्ला दिला. अमेरिकन राजकारणातील दोन दिग्गजांची लढाई पाहणे औत्सुक्याचे आहे. जूनच्या पंधरवड्यात ४८ तासांच्या अंतरावर जेब आणि हिलरी यांनी खुल्या मंचावर अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली होता. दोघांनीही आपले आडनाव बुश आणि क्लिंटन तूर्तास बाजूला ठेवले होते. सीएनएन/ओआरसीच्या सर्वेक्षणात विचारण्यात आले होते की, हिलरी माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी असल्याने त्यांना मतदान जास्त होण्याची शक्यता आहे की नाही, त्याच्या पक्षात आणि विरोधात ३९-३९ टक्के मते पडली. जेबसाठी आव्हान साफ आहे. सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले, की राष्ट्राध्यक्षाचा मुलगा आणि भाऊ असण्याने काही फरक पडतो का? ५६ टक्के लोकांनी जेबला मतदान करण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले, फक्त २७ टक्के लोकांनी मत देण्याची शक्यता असल्याचे म्हटले. हिलेरी आणि जेबला निवडणुकीसाठी निधी गोळा करण्यासाठी विशाल काैटुंबिक नेटवर्कची मदत मिळणार आहे. जॉर्ज बुश यांना पैसे देणाऱ्या १३६ बड्या हस्तींनी अभियानाच्या पहिल्या १५ दिवसांत जेबला पैसे दिले असल्याचे, वाॅल स्ट्रीट जर्नलने छापले आहे. सध्यातरी, जेबच्या तुलनेत हिलरी यांना एवढे मोठे आव्हान नाही.

क्लिंटन यांच्या सांगण्यावरून हिलरी राजकारणात
क्लिंटन सांगतात, त्यांनी ४० वर्षांपूर्वी हिलरी यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिल्याचे ते सांगतात. मी त्यांच्याकडे तीनवेळा विवाहाचा प्रस्ताव ठेवला, मग कुठे त्या तयार झाल्या.मी पहिल्यांदा हिलरी यांना म्हटले होते, मी तुमच्याशी विवाह करू इच्छितो. मात्र, तुम्ही असे नाही केले पाहिजे. तुम्ही तुमच्या पिढीच्या सर्वात प्रभावशाली राजकारणी आहात. माझ्याशी विवाह करण्यापेक्षा तुम्ही शिकागो किंवा न्यूयॉर्क येथे जाऊन राजकारणात भाग घ्यावा. तेव्हा हिलरी म्हणाल्या होत्या, मी कधीच निवडणूक लढवणार नाही. मी सर्वाधिक आक्रमक आहे. मला कुणीही मतदान करणार नाही.
पत्नीसाठी नुकसानकारक
बिल क्लिंटन जेव्हा पत्नीची मदत करण्यासाठी पुढे येतात तेव्हा परिस्थिती बदलते. २००८मध्ये हिलरी यांना पार्टीकडून मैदानात उतरवण्याचा प्रयत्न फसला. यावेळी ते दूर आहेत मात्र, दुर्लक्षित नाही. गेल्या काही महिन्यांच्या दरम्यान, हिलरी यांची लोकप्रियता खासगी इ-मेल सर्व्हर व क्लिंटन फाउंडेशनच्या घडामोडींमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांच्या ओझ्याखाली कमी होत गेली. सर्वेक्षणांतून संकेत मिळाले आहेत, की, सर्वाधिक अमेरिकन हिलरी यांना मजबूत नेता तर मानतात मात्र, त्यांच्यावर विश्वास नाही.
बातम्या आणखी आहेत...