Home »Divya Marathi Special» Two Friend Guarding On Highway From Last Seven Years

दोन मित्र घालतात पाच वर्षांपासून रात्रभर गस्त

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 05, 2013, 23:17 PM IST

  • दोन मित्र घालतात पाच वर्षांपासून रात्रभर गस्त

ठाणे- पाठीच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी शैलेश भट्ट मुंबईत आले आहेत. त्यांनी घेतलेल्या ध्यासामुळे हा आजार मागे लागला आहे. ते पाच वर्षांपासून रात्रभर बाइक चालवतात. हायवेवरून जाणा-यांच्या सुरक्षेसाठी. त्यांना साथ देतात त्यांचे मित्र महेंद्र माने. 2007 च्या एका रात्री लूटमार करणा-या दोघांना या दोन मित्रांनी चोख उत्तर दिले; पण नंतर विचार केला, प्रत्येक व्यक्तीला असा मुकाबला करणे कठीण आहे.


ठाण्याजवळील पालघर येथे राहणारे शैलेश लेबर काँट्रॅक्टर आणि महेंद्र यांचेही तेथेच फुटवेअरचे दुकान आहे. दोघांच्या जुन्या मैत्रीला आता एक ध्येयाची दिशा मिळाली आहे. दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेवण करून ते थोडा आराम करतात व रात्री 12.30 वाजता निघतात वकोबा घाटाच्या रस्त्यावर. वायरलेस सेट आणि सर्चलाइट घेऊन. हा परिसर लूटमारीसाठी कुख्यात आहे. सकाळी 4.30 वाजता घरी परततात. वाटसरूंना संरक्षण देतात आणि नंतरच झोप घेतात.
महेंद्र माने सांगतात की, त्यांच्या या उपक्रमात अनेक जण सहभागी आहेत. ते काही दिवस गस्तही घालत होते; पण प्रत्येकला हा दर रात्रीचा नियम करणे कठीण होते. ते सांगतात, सुरुवातीला कुटुंबातूनही आम्हाला विरोध झाला. आमची सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने त्यांना हे काम आवडले नाही.

6 दरोडेखोर पकडले, 50 पेक्षा जास्त गुन्हे रोखले
गस्त घालताना शैलेश आणि महेंद्र यांनी 5-6 अट्टल दरोडेखोरांना पोलिसांच्या हवाली केले. अनेक वेळा लुटारूंशी सामना झाला. 50 पेक्षा जास्त गुन्हे रोखले. अनेक वेळा धमक्या आल्या; पण ते थांबले नाहीत. या कामासाठी दोघांना शौर्य पुरस्कारही मिळाला आहे. आज लोक कौतुक करतात तेव्हा कुटुंबीयांना अभिमान वाटतो. शैलेश सांगतात, सुरक्षेच्या मुद्द्यावरून सर्व जण पोलिसांना दोष देतात. याउलट प्रत्येकाने सजग झाल्यास ही समस्या उरणारच नाही.

Next Article

Recommended