आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Indian Girl Arrest Before Joining Islamic State

EXCLUSIVE: मेडिकल, कॅटच्या 2 मुली आयएसमध्ये सामील होण्यास होत्या उत्सुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - 23 वर्षांची सबिना (काल्पनिक नाव) एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे. ती जीन्स आणि बुरखाही वापरत आहे. करीमनगरच्या या तरुणीची कॅट परीक्षेची तयारी करत असलेल्या मैत्रिणीसोबत इराकमध्ये आयएसआयएस संघटनेत सामील होण्याची इच्छा होती. मात्र, पोलिसांना याची कुणकुण लागली आणि तिचा मनसुबा यशस्वी झाला नाही. देशाच्या दृष्टीने हा दहशतवादाचा नवा चेहरा आहे.

हैदराबादमध्ये पकडलेल्या चार तरुणांच्या चौकशीतून ही योजना उघडकीस आली. संबंधित चौघेही आयएसआयएसमध्येही जाण्याच्या तयारीत होते. खोलात चौकशी केल्यानंतर चौघेच नव्हे, तर ४० जणांचा गट त्यासाठी उत्सुक होता, असे समजले. विशेष म्हणजे त्यात दोन तरुणी होत्या. संबंधितांनी फेसबुकवर अहले हदिस (काल्पनिक नाव)नावाच्या पेजवर ग्रुप बनवला होता. त्यामध्ये एक सबिनाही होती. ती आपला भाऊ अफझलसोबत (काल्पनिक नाव) दहशतवादी लढ्यात सहभागी होऊ इच्छित होती. कोणतीही किंमत मोजून या लढ्यात सहभागी व्हायचेच असा निश्चय तिची मैत्रीण रुखसानाने केला होता. त्यासाठी तिने आपल्या आईस इराकला जाण्यासाठी तयार केले होते. मात्र यामागचे खरे कारण तिने सांगितले नव्हते.

भारतातील तरुणांवर आयएसआयएसची छाप आहे, याची जाणीव स्थानिक पोलिसांना होती. मात्र, मुलींच्या उत्साहामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे केवळ तरुणांवर नव्हे, तर तरुणींवरही निगराणी आवश्यक ठरली असून त्या दृष्टीने कामही सुरू झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुढे वाचा, ४०तरुण एका ट्रस्टच्या महाविद्यालयांतील...