आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० हजार आणि 4 दिवसांत घाट स्वच्छ, पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेमसुतुला इमसोंग
जन्म : २३ फेब्रुवारी १९८३
शिक्षण : शिलाँगमधून बीए
कुटुंब : वडील चुंगापांगसुसंग इमसोंग, आई तेमजेनमोंगला, ५ बहिणी, २ भाऊ
दर्शिका शहा
जन्म : २४ फेब्रुवारी १९९३
शिक्षण : दिल्लीतून बीकॉम
कुटुंब : वडील दीपककुमार गुजराती, आई कामिनी गुजराती, लहान भाऊ दर्पण.
वाराणसीच्या प्रभूघाटाच्या स्वच्छतेसाठी मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
(फोटो डावीकडे दर्शिका आणि उजवीकडे तेमसुतुला)
"एके दिवशी सकाळी सहा वाजता एका मित्राचा फोन आला. त्याने त्यात पंतप्रधान मोदी यांनी आमच्या कामाचे कौतुक केल्याचे सांगितले. मला हा आनंद कोणत्या शब्दांत व्यक्त करावा हे कळत नाही. घाट स्वच्छ करण्यात जेवढा काही थकवा अाला तो आता संपला आहे...' नागालँडच्या तेमसुतुला आणि दिल्लीच्या दर्शिकासाठी हा एक स्वप्नवत अनुभव होता. मोदींनी त्यांच्या प्रभूघाट मोहिमेचे कौतुक केले होते.

तेमसुतुला म्हणाली, "नागालँडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कुटंुबाला हातभार लावण्यासाठी दिल्लीत नोकरी सुरू केली. ब्रिटिश काैन्सिलमध्ये ऑनलाइन इंग्रजी शिकवत होते. त्या वेळी सामाजिक कार्यासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे नोकरी सोडून वाराणसीला जाण्याचा निर्णय घेतला.' तेमसुतुला आणि दर्शिका यांनी २०१२ मध्ये शूलटंकेश्वर घाटाची स्वच्छता केली होती. आपल्या टीमकडून स्वच्छ केला जाणारा हा पहिला घाट होता.

तेमसुमुला नागालँडची रहिवासी आहे. सात बहीण-भावांमध्ये तिचा सहावा क्रमांक आहे. घरात कधी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. आपल्या मर्जीनुसार कॉलेजचे शिक्षण घेतले आणि मर्जीनुसारच पाहिजे त्या शहरात राहिली. यामुळेच समाजकार्यात करिअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबाने आडकाठी आणली नाही. उत्तराखंडच्या नैसर्गिक संकटात आपल्या टीमसोबत तेथील ११ गावांत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले होते. त्यांनी बनवलेल्या रोप-वेमधून लोकांना सुरक्षित बाहेर काढले होते. तो रोपवे आजही वापरात आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघी नौकाविहार करत असताना घाणीचे साम्राज्य असलेला प्रभूघाट दिसला. त्याला खुल्या शौचालयाचे स्वरूप आले होते. येथून मिशन प्रभूघाट सुरू झाले. सोशल मीडिया आणि स्वयंसेवकांनी दहा हजार रुपये जमा केले. यातून चार दिवसांत पूर्ण घाट स्वच्छ करण्यात यश मिळाले.
बातम्या आणखी आहेत...