विश्वास यांच्यावर लालूविरोधकांचा / विश्वास यांच्यावर लालूविरोधकांचा शुभेच्छा वर्षाव

Jun 03,2011 05:45:24 PM IST

चारा घोटाळ्याला फायलींमधून बाहेर काढणारे यू. एन. विश्वास ममतांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदावर रुजू झाले आहेत. यामुळे दिल्लीपासून बिहारपर्यंतच्या नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बिहारमध्ये लालू यादवांवर अधिकारांचा हक्क बजावल्यामुळे बिहारमधून त्यांना शुभेच्छा देणारे कमी नाहीत. नितीश कुमारांनी ममता बॅनर्जींना याआधीच शुभेच्छा दिल्या; पण विश्वास मात्र थांबले होते. एकदा मंत्रिपद मिळाले की ममतादीदींचे अभिनंदन करायचे त्यांनी पक्के केले असावे. मंत्रिपद मिळाल्यानंतर ममतांचे त्यांनी अभिनंदन केले, तर विश्वास यांना सुशीलकुमार मोदींच्या शुभेच्छाही मिळाल्या. या शुभेच्छांचे महत्त्व यासाठी आहे की, विश्वास यांच्यामुळे लालू चारा घोटाळ्यात अडकले होते. सुशील मोदींनी विश्वास यांना शुभेच्छा देऊन लालूंना हाच संदेश दिला आहे की, त्यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का देणाऱ्यांच्या पाठीशी मोदी नेहमीच होते.

X