आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udayanraje Bhosale And Sharad Pawar Issue At Satara

...तर उदयनराजे शोधणार नवा राष्ट्रीय तवा आणि थापणार नवी भाकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा येथील पत्रकार परिषदेत राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील तवा रिकामा आहे,भाकरी फिरवण्याचा प्रश्नच नाही असे सांगत विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटात अस्वस्थता आणि खासदार उदयनराजे भोसले विरोधी गटास दिलासा दिला. या वेळी त्यांनी मूळ मुद्द्याला बगल देत प्रश्न कायम ठेवला. खासदार भोसले यांना उमेदवारी मिळणार की इतर कोणाला यावर अजून काही दिवस चर्वितचर्वण होणार असले तरी रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, वसंतराव मानकुमरे यांनी स्वत:च्या भाकºया तयार ठेवल्या आहेत आणि नामदार शशिकांत शिंदे यांच्या भाकरीचे पीठ ही दळून-मळून तयार आहे. कोणत्या भाकरीला तवा मिळतोय याची आता पुन्हा नव्याने प्रतीक्षा आहे. दुसरीक डे खासदार भोसले यांनी पुन्हा एकदा दबावतंत्राचा वापर करत एकीकडे त्यांना राष्टवादीची उमेदवारी पाहिजे असे दाखवत त्याचवेळी मात्र ते इतर पक्षांची चाचपणी सुरू ठेवली आहे. विषेशत: भारतीय जनता पक्षाची. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आघाडी आणि युती दोघेही आपापसांत अदलाबदल करण्याच्या विचारात आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा जिल्हा पुन्हा काँग्रेसचा बालेकील्ला करण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली पाहिजे. आघाडीच्या मित्रपक्षांची सशर्र्त मदत ते यासाठी ते घेतील. अजित पवार यांना सातारा राष्ट्रवादीसाठी पाहिजे मात्र, खासदार भोसले यांना त्यांची पसंती मनापासून असणार नाही. यासाठी नफ्याचे गणित मांडण्यासाठी जागा बदलणे त्यांना फायद्याचे आहे. थोडक्यात कॉँग्रेस-राष्टवादीला जागा बदलणे सोयीचे आहे. सातारा, हातकणंगले, बारामती, पुणे या जागा बदलायच्या का, यावरही आघाडीत चर्चा आहे. सातारा बदलामुळे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण होईल याचा अंदाज शरद पावर यांना नक्कीच आहे. किंबहुना हा विषय चर्चेत राहावा यासाठीच त्यांनी साताºयांचा तवा रिकामा असल्याचे विधान केले आहे.

उदयनराजे यांची स्वत:ची उमेदवारी नक्की पण ती त्यांच्यादृष्टीने. त्यांची उमेदवारी सर्व पक्षांना मान्य होईल, अशी आशा, विश्वास त्यांना आहे. मध्यंतरी त्यांनी भाजप, शिवसेना, आरपीआय पक्षांच्या प्रमुखांशी गाठीभेटी घेतल्या होत्या. रामदास आठवले यांनी त्यांना उमेदवारी देतो, असे सांगीतल्याचे जगजाहीर आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मुंडे कनेक्शन भाजपशी त्यांची जवळीक स्पष्ट करणारी आहे. पवार यांच्या म्हणण्यानुसार राष्टवादीचा तवा रिकामा राहणार असेल तर खासदार भोसले नव्या तव्यावर नवी भाकरी टाकतील. स्वत:ची चूल, स्वत:चा तवा आणि स्वत:ची भाकरी हे समीकरण भाकरीला पापुद्रा न सुटणार असतानाही त्यांना अनुभवाने कळले आहे. अशा वेळी आपल्या तव्यावरची भाकरी दुसर्‍यांच्या पानात जाते हे समजल्याने राष्ट्रीय तवा ते आता शोधतील किंवा राष्ट्रवादीची ताकद मिळाली तर त्याच तव्यावर तीच भाकरी न पलटवता भाजून घेतील.