आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या पश्चात आप्तांना मिळेल अशी संपत्ती कमवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनीलकुमार यांचा व्यवसाय होता. त्यांचे एक दुकान होते. त्यांचे छोटे कुटुंब सुखात होते. त्यांनी दोन्ही मुलांना चांगले शिकवले, लग्ने लावून दिली. नातवंडांनी भरलेल्या घरात त्यांचे आयुष्य आनंदात चालले होते. एक दिवस अचानक सुनीलकुमार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पत्नीवर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला. कोण येतोय आणि कोणत्या कागदपत्रांवर सही घेऊन जातोय, याचे त्यांना काहीच भान नव्हते. सुनील यांनी आयुष्यभर पैसा कमावला, पण थोडे लक्ष पैशाच्या योग्य गुंतवणुकीकडे द्यावयास हवे होते, संपत्तीचा वापर कोणी कसा करावा, हे निश्चित करायला हवे होते. सुनील यांनी इच्छापत्र लिहून ठेवले असते, तर योग्य ठरले असते. अर्थात इच्छापत्र हे काही निर्णायक नाही, पण पत्नीला मुलांच्या दयेवर जगावे लागणार नाही, किमान याची तरी त्यांनी काळजी घ्यायला हवी होती.

त्यांनी या तीन बाबी करायला हव्या होत्या. सर्वात पहिली बाब म्हणजे, त्यांची संपूर्ण संपत्ती संयुक्त नावावर असायला हवी होती. यामुळे त्यांच्या पत्नीला भक्कम आधार राहिला असताच, शिवाय अशा दु:खाच्या प्रसंगात गुंतवणूक, शेअर्स आणि बाँड्ची चिंता करावी लागली नसती. दुसरी बाब - प्रत्येक गुंतवणुकीसाठी वारस म्हणून कोणाचे तरी नाव लावावे. यामुळे पैसा लगेच हातात पडतो. नॉमिनेशन असेल, तर दोन्ही मुलांमध्ये व्यवस्थित वाटणी झाली असती.

तिसरी बाब - तुमची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांव्यतिरिक्त एखाद्या विश्वासू व्यक्तीला तुमच्या एकूण संपत्तीची कागदपत्रे कोठे ठेवली आहेत, तसेच कशात गुंतवणूक केली आहे, याची माहिती असावी. असे असल्याने भावनेच्या भरात वाहून न जाता संपत्तीचे योग्य वाटप करता येऊ शकते. गुंतवणूकदाराचे निधन होताच, त्याचे मृत्यू प्रमाणपत्र सोपवल्यावर सगळी संपत्ती संयुक्त भागीदाराच्या नावावर होते. यामध्ये इतर कोणत्याही औपचारिक पूर्ततेची गरज नसते. वारस म्हणून ज्याचे नाव असेल, त्याला विश्वासाच्या बळावरच संपत्तीचा अधिकार मिळू शकतो. अन्यथा इतर दावेदार न्यायालयात धाव घेऊन संपत्तीची फेरवाटणी करण्याची मागणी करू शकतात. यामुळे इच्छापत्र लिहिणे, हा योग्य पर्याय आहे. हा एक साधा सोपा दस्तऐवज आहे. यामध्ये संपत्तीचे वाटप करण्याच्या सूचना सहीनिशी नमूद असतात. असा एखादा दस्तऐवज असता, तर सुनीलकुमार यांच्या घरात वाटण्यांवरून वाद झालाच नसता. यातून आपण धडा घेऊन संपत्ती वाटपाच्या नियोजनासाठी काही काळ द्यायला हवा.