आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uma Shashikant Article About Investment , Divya Marathi

बचतीसोबत गुंतवणूक केल्यास खर्चासाठी अधिक पैसे मिळतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे युवक बचत करत नाहीत, अशी ज्येष्ठांची तक्रार असते. जुन्या काळात नोकरी मिळणे अवघड होते. ज्यांना नोकरी मिळायची ते त्याच नोकरीत निवृत्त होत होते. तसेच त्यांचे वेतनही जास्त वाढत नव्हते; परंतु कुटुंबाच्या जबाबदाया मात्र वाढत होत्या. कुटुंब प्रमुख निवृत्त होईपर्यंत स्वत:चे घर होणे, ही नशिबाची गोष्ट मानली जायची. गृहिणी आवश्यक कामांसाठी पैसे लपवून ठेवायच्या. ती पिढी बचत करणारी होती.
आजचे युवक मात्र पूर्णपणे या मताविरुद्ध आहेत. तथापि, त्यांना नोकरी मिळवण्यासंदर्भात आत्मविश्वास आहे. नोकरीसाठी ते सध्याच्या कंपनीवर अवलंबून नसतात. तसेच नेहमी नवीन जोखीम घेण्याच्या तयारीत असतात. नवीन आणि चांगल्या नोकरीचा शोध सुरू असतो. त्यामुळे पगारवाढीच्या त्यांच्या अपेक्षा अधिक असतात. पुढे जाण्यासाठी जोखीम पत्करतात व बचतीपेक्षा पैसे खर्च करणे त्यांना चांगले वाटते. जुनी पिढी नव्या पिढीत नेहमी दोषच पाहत आली आहे; परंतु आता वेळ बदलली आहे. आजच्या युवकांकडे डायनॅमिक मार्केट आहे, नोकरी आणि पैसे सहज कमावण्यासाठी उद्योग आहेत. आशावादी असणाया व्यक्ती हे मार्केट चालवत आहेत; परंतु या बाजारीकरणात कधी तरी मंदीचा काळही येतो. त्यादरम्यान कर्मचारी कपातही केली जाते. अनेकांच्या नोकया जातात व पगारही थांबवला जातो. त्यामुळेच युवकांनी बचत करायला हवी. कारण त्यांच्यासमोर अनिश्चित भविष्य असते आणि त्याचा परिणाम जीवनावर होत असतो.
अनुभव हा सर्वात चांगला शिक्षक आहे. आजचे युवक हातात पैसा असला म्हणजे सढळ हाताने खर्च करतात. मंदीचा काळ असतो तेव्हा बचतीसारखी परिस्थिती नसते. त्या वेळी मात्र ते वेगळा मार्ग अवलंबतात. त्या वेळी ते फक्त बचत करत नाही, तर गुंतवणूकदार होतात. आपले पैसे एका संपत्तीतून दुसया संपत्तीच्या खरेदीसाठी वापरतात. त्यामुळे त्यांना बचतीबरोबर खर्च करण्यासाठीही पैसे मिळतात. आजची पिढी केवळ भाग्यशाली नाही, तर जुन्या पिढीपेक्षाही अधिक चांगल्या परिस्थितीत आहे. या पिढीला वेळेचे भानही अधिक आहे. uma.shashikant@dainikbhaskargroup.com