आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी हे जरूर वाचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हीच वेळ आहे, जेव्हा आपण नव्या वर्षाचा संकल्प करत असतो. पैशाबाबत संकल्प करताना ते सरळ असावेत, लागू करण्यात त्रास होऊ नये आणि त्याचे परिणामही चांगले होतील. या संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवा.
सर्वप्रथम काही गोष्टी ध्यानात घ्या. गुंतवणूक न करता पैसे तसेच पडू न देणे ठीक नाही. इंटरनेट बँकिंगवर जा. म्युच्युअल फंडात अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड रोखे खरेदी करा. एका दिवसात रिडेप्शन्स होतात. गुंतवणूक केलेल्या प्रत्येक रुपयांवर व्याज मिळते. यामुळे चांगले रिटर्नही मिळतात.
आता दुसरी गोष्ट. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आताच बचत करा. तुमचं वय कितीही असेल, भविष्यात तुम्ही जेव्हा कमवणे बंद कराल तेव्हा तुम्हाला पैशाची गरज लागेल. एक रक्कम निश्चित करा. इक्विटी इंडेक्स फंडात एसआयपीच्या माध्यमात रक्कम ठेवा. हे वारंवार तपासून पाहण्याची गरज नाही. हा तुमचा स्वत:चा पेन्शन फंड आहे. वेळेबरोबर याची किंमतही वाढत जाईल. तिसरी गोष्ट. पैशाबाबत कुटुंबाशी चर्चा करा. मुले लहान असतील किंवा पती किंवा पत्नीला फायनान्स या विषयाची आवड नसेल तरीही ही चर्चा करा. पैशाबाबत कुटुंबाशी चर्चा करा आणि नंतर याच्याशी संबंधित घेतलेले निर्णय स्वीकारा.
चौथी गोष्ट. पैशाबाबत कोणताही निर्णय सबुरीने घ्या, असा स्वत:शीच निश्चय करा. आयपीओ, एनएफओ, शेअर, बाँड खरेदी करण्यापूर्वी हे आपण का व कशासाठी करत आहोत हे समजून घ्या. तुमच्या सल्लागाराला थोडी वाट पाहू द्या. रिलेशनशिप मॅनेजरला पुन्हा पुन्हा येऊ द्या. हा तुमचा पैसा आहे, निर्णय नीट विचार करून घ्या. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सल्लागारांनी आपली बुद्धी वापरावी, स्वत:ची समग्र माहिती लक्षात ठेवावी, कर्ज आणि पैसा यांचे संतुलन राखावे, छोटे संकल्प करा. ते अमलात आणताना गैरसोय होणार नाही.