आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनासाठी लोकांना समजून घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व मोठ्या संस्था आणि तेथे काम करणारे लोक सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटकडे लक्ष देत आहेत. या स्किल्समुळे व्यक्तिगत विकास होतो. यातून कम्युनिकेशन स्किल्स, इमोशनल इंटेलिजन्स वगैरेंचा समावेश आहे. इमोशनल इंटेलिजन्सद्वारे आपल्या आणि इतरांच्या भावना जाणून घेणे व त्यांचा आढावा घेणे सोपे होते.

उदाहरणार्थ जयपूरच्या एका इंजिनिअरिंग कंपनीत रजत सीईओ आहे. त्याच्या कंपनीने नुकतीच इंदूरमधील एक इंजिनिअरिंग कंपनी खरेदी केली आहे. नव्या कंपनीत रजतला सीईओपद देण्यात आले आहे. ही कंपनी कस्टमर-फे्रंडली आहे. रजतने बुधवारी सकाळी 8 वाजता मीटिंग बोलावली. तो सात वाजता ऑफिसमध्ये पोहोचला. त्याला ऑफिसमध्ये काही लोक दिसले. त्याने मोजक्याच लोकांसह बरोब्बर आठ वाजता मीटिंग सुरू केली. त्याने शेअरहोल्डर्सना प्राधान्य असल्याचे सांगून त्यांची जबाबदारी आपल्यावर असल्याचे म्हटले. कंपनीच्या उद्दिष्टांबाबत सांगताना रजत म्हणाला की, जे लोक या उद्दिष्टांशी समरस होणार नाहीत त्यांच्यासाठी कंपनीत अजिबात जागा नाही. जे लोक ऑफिसमध्ये वेळेवर येऊ शकत नाहीत ते नव्या योजनेत सहभागीही होऊ शकणार नाहीत. रजतने दुपारी एक्झिक्युटिव्ह टीमला नवी स्ट्रॅटेजी, गोल, नंबर आणि डेडलाइनची माहिती दिली. तीन महिन्यांनंतर पहिल्या क्वॉर्टरच्या रिपोर्टनुसार उद्दिष्ट गाठण्यात कंपनीला पूर्णपणे यश आले होते. मात्र, ग्राहक कमी झाले आणि त्यांच्या तक्रारीही वाढल्या. रजतने कंपनीच्या मॅनेजमेंट टीमशी नव्या रिपोर्टवर चर्चा केली. सूचना मागवल्या तेव्हा सर्वजण गप्प होते.

ऑर्गनाझेशनल सायकॉलॉजिस्ट डॅनिअल गोलमॅन यांनी इमोशनल इंटेलिजन्सचे चार भाग सांगितले आहेत- सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट, सोशल अवेअरनेस आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट. रजतने हे नियम लक्षात ठेवले असते तर त्याचा परिणाम नक्कीच चांगला झाला असता. यात अ‍ॅसेसमेंट टूल्सचा लाभ घेणे, लीडरशिप प्रोग्रामद्वारे निकाल उंचावण्याचा प्रयत्न करणे, वेळोवेळी रिकग्निशन व रिवॉर्ड सिस्टिमचा आढावा घेणे, कोचिंग आणि अ‍ॅक्शन-प्लॅनिंग प्रोसेसचा अवलंब करणे इत्यादींचा समावेश आहे.

विक्रम छाछी
इव्हीपी, डीएचआर इंटरनॅशनल, मुंबई