आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्येक कामात भावना समजून घेणे आवश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काम मग कुठलेही असो, आदेश वा दिग्दर्शन-मार्गदर्शन करण्याऐवजी तुम्ही काम असे सादर करा की, तुमची टीम ते काम करण्यासाठी स्वत:हूनच पुढे आली पाहिजे. या प्रक्रियेला सहज सोपे करण्यासाठी आपल्या टीमला सतत प्रोत्साहन द्या. टीमच्या संघभावनेशी जोडून घ्या. तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. यासाठी खालील टिप्स जरूर वाचा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून....

आदेश देण्यापेक्षा टीमचा विचार समजून घ्या
आम्ही असे समजतो की, टीमला हाताळण्याचा सर्वात चांगला प्रकार तुम्हाला सरळपणे सांगावा की, ज्यामुळे त्यांना काम नक्की काय करायचे ते कळावे. मात्र, यामुळे नेहमीच खूप फरक पडेल असे नाही. कारण की, कुणाही व्यक्तीला दुसर्‍या एखाद्या व्यक्तीचे काम करण्याची इच्छा कधीच नसते. यामुळेच टीमला आदेश देण्याऐवजी त्यांना प्रोत्साहित करा. असे तुम्हाला दिवसातून अनेक वेळा करता येईल. जसा दुसर्‍यांना नवा प्रकल्प देण्याची तुमची इच्छा आहे अथवा तुम्ही जो फीडबॅक (प्रतिसाद) दिला आहे ते म्हणजे टीम सदस्य त्याला जोडलेले आहेत की त्यांना बदल हवा आहे हे पाहता येईल. लोकांना कमी मार्गदर्शन आणि जास्त स्वत:च स्वत:च्या मनाने आपले वा दिलेले काम करायला जास्त आवडत असते. तुम्हीदेखील त्यांना तसेच तयार करा. टीमच्या भावभावनांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करा. उदा. जसे आपल्याला एखाद्याला त्याच्या चांगल्या कामगिरीविषयी सांगायचे असेल तर त्याला थेट तसे सांगण्याऐवजी त्याला एखादी भावनात्मक कहाणी ऐकवा. (स्रोत : हाऊ टू गेट एम्प्लॉइज एक्सायटेड टू डू देअर वर्क, केली डेकर, बेन डेकर)

मदत करता करता आपण पुशओव्हर म्हणजे कामगारच तर झालो नाही ना :
बर्‍याचदा दुसर्‍यांबरोबर काम करताना त्यांच्याबरोबर जोडून घ्यावे लागते. हे खरे आहे की आपण मदत करू इच्छित असतो. मात्र, दुसर्‍यांनी आपल्याला केवळ मदत करणारा कामगार, हमाल या दृष्टिकोनातून पाहू नये. जर का आपण स्वत:ला हे समजू शकत असाल तर हेही जरूर लक्षात घ्या की, दुसरेही आपल्यातल्या या मानसिकतेची (गोष्टीची) दखल घेत असतात. त्यामुळे मग चर्चा संपताच आपला दृष्टिकोन आपल्यापुरताच राहतो. त्यामुळे मग टीमच्या इतर सदस्यांवर असे सकारात्मक आरोप करा की, ते आपल्याला कामात बोलण्याची संधीच देत नाहीत. आपल्याला मग त्यामुळे विविध कार्यांत पुढे केले जाते, आपल्या कॅलेंडरवर अनेक बैठका दिलेल्या आहेत. ज्यामुळे आपणाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळेच नाहीये की, ज्युनियर्सचे प्रमोशन आधी झालेय याकडे लक्ष द्यायला वेळ नाही हे टीम सदस्यांना हेतूपूर्वक जाणवून द्या. (स्रोत : सायन्स दॅट यू आर बीइंग अ पुशओव्हर, एमी जेन सु)

स्वत:ची जागा तयार करण्याचा प्रयत्न करत राहा
एक चांगला मेंटर आपल्यासाठी नक्की आवाज उठवेल. राजकारणापासून जपून आपल्याला वाचवेलही आणि तुम्हाला ऑफिसमध्ये योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे सादरही करेल. मात्र, दुसर्‍यांना आपल्या उपस्थितीची जाणीवच होत नसेल तर काही फायदा नाही. कुठे असे तर नाही ना की बॉसबरोबरचे आपले नाते आपल्याला खेचतेय, आपले नुकसान करतेय? ते ओळखा असे - आपल्या विभागाबाहेरही लोक आपल्याला आपल्या वैशिष्ट्यामुळे जाणतात का? नसता बॉसला सांगा की, त्यांनी दुसर्‍या विभागातील लोकांना सांगावे की, आपली कामगिरी काय आहे ते. दुसरे असे की, स्वत:ला खूप दूरदर्शी बनवण्यासाठी प्रयत्नरत राहा. जसे नव्या प्रकल्पात स्वत:हून पुढे या. त्याची जबाबदारी स्वत:हून उचला. बैठकांमधून वरिष्ठांशी बोलत राहा. तिसरे दुसर्‍याही टीमबरोबर सहज सोप्या पद्धतीने जोडले जाण्याचे प्रकार शोधून काढा. उदा -जसे फुटबॉल टीमचा भाग बना. (स्रोत : यू कान्ट मूव्ह अप इफ यू आर स्टक इन युवर बॉस शैडो)