आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • United Nations And Netherland Neglected The Mars Campaign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संयुक्त राष्‍ट्राची बगल, नेदरलँडची डोळेझाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळ स्वारी करण्याच्या नावावर लाखो लोकांकडून पैसे उकळण्यात आले, मात्र या मुद्द्यावर आंतरराष्‍ट्रीय संस्थेने अद्याप दखल घेतली नाही. दिव्य मराठी नेटवर्कच्या धीरेंद्र राय यांनी युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आऊटर स्पेस अफेअर्स आणि नेदरलॅँड अंतराळ संस्थेला मार्स-वन प्रोजेक्टशी संबंधित प्रश्न ई-मेल केले. अंतराळवीरांना सुरक्षितरीत्या परत पृथ्वीवर आणण्याची हमी देणे ही कोणत्याही अंतराळ मोहिमेची पहिली अट असते.


नेदलॅँडच्या एका खासगी कंपनीकडून लोकांच्या एकेरी प्रवासाशी संबंधित चिंता आंतरराष्‍ट्रीय संस्थेच्या लालफितीच्या कारभारात अडकल्या आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अंतराळाशी संबंधित प्रकरणाच्या विभागानुसार, (यूएनओओएसए) नियमावली बनवणे हे आपले काम असून त्याचे पालन करणे संबंधित देशाच्या सरकारवर अवलंबून असल्याचे सांगण्यात येते. अंतराळाशी संबंधित कोणतेही काम अधिकृत करणे किंवा त्यावर देखरेख करणे हे यूएन सचिवालयाचे काम आहे.

विभागाचे विधी अधिकारी सरगेई ए. नेगोडा यांनी दिव्य मराठी नेटवर्कला सांगितले की, मार्स-वन प्रोजेक्टशी संबंधित कंपनीवर देखरेख करण्याची जबाबदारी नोंदणी झालेल्या तसेच परवाना मिळवलेल्या देशाची आहे. म्हणजेच ती नेदलॅँडची आहे.

दुसरीकडे, नेदरलॅँड सरकारने आपली जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, मार्स-वनमध्ये हस्तक्षेप करावा या अवस्थेत सध्या प्रोजेक्ट नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नेदरलॅँड अंतराळ संस्थेच्या संचार व शिक्षण विभागाचे अध्यक्ष जॅस्पर वॅमस्टेकर यांनी संस्थेचा मार्स-वन प्रोजेक्टशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे. ही खासगी संस्थेची मोहीम असून ती प्राथमिक अवस्थेत असल्याचे ते म्हणाले. प्रोजेक्ट वास्तवात उतरणे खूप दूरची गोष्ट आहे. वॅमस्टेकर म्हणाले, आम्ही कुणाची परवानगी तसेच याबाबत तांत्रिक सल्लाही मागितला नाही. आमचे या प्रोजेक्टवर लक्ष आहे. आवश्यकता पडल्यास अंतराळाशी संबंधित आपल्या कायद्यांची अंमलबजावणी ठरवली जाईल.

‘दिव्य मराठी’चे प्रश्न
1. सुरक्षित परत आणण्याच्या हमीशिवाय व्यक्तीला कोणत्याही ग्रहावर नेण्याची परवानगी दिली जाऊ शकते का?
2. परवानगी नसेल तर मार्स-वनविरुद्ध आपण कोणती कारवाई करणार आहात?
3. आपण यूएन सदस्य देशांच्या अंतराळ कार्यक्रमाचे संरक्षक आहात. त्यामुळे तुम्ही नेदरलॅँडच्या अंतराळ संस्थेला काही दिशानिर्देश देताय काय?
परवानगी अशक्य : इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन
> मार्स-वन मिशन जेव्हा लोकांना अंतराळात घेऊन जाईल, तेव्हा त्यांना आपले अंतराळवीर कुठपर्यंत अंतराळात राहतील आणि कसे सुरक्षित परततील हे त्या देशाला कळवावे लागेल.
> मार्स-वन कंपनीला या बाबी सांगण्यात अपयश आले तर जगातील कुठलाही देश आपल्या प्रक्षेपण स्थळावरून उड्डाण करण्यास परवानगी देणार नाही.
> मार्स-वनमध्ये फसवेगिरी आढळल्यास कारवाईची जबाबदारी नेदरलॅँड पोलिसांची असेल, तेथील अंतराळ संस्थेची नव्हे.