आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताज्या माहितीतून अपडेट रहा, तुमची मागणी वाढेल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अचूक व विश्वासार्ह माहिती देणा-या मॅनेजर्सना मोठी मागणी असते. त्यांचे अन्य सहका-यांशी संबंध चांगले असतात. यासंदर्भात टिप्स वाचा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून...
टिप्स
खासगी माहिती देताना काळजी आवश्यक
जे मॅनेजर्स विश्वासार्ह आणि ताज्या माहितीतून अपडेट असतात त्यांना टीम आधारीत कंपन्यांमध्ये वाढती मागणी असते. आपले विचार, समज आणि अनुभव संस्थेला किंवा कंपन्यांना सांगणे अनेकदा उलट परिणाम करू शकते. आपल्याबाबत विश्वासार्ह माहिती देण्याच्या काही पद्धती...
संदर्भ काय : वैयक्तिक माहिती देण्यासाठी काही समूह जास्त रुची दाखवतात. त्यामुळे वस्तुस्थिती व संघटनात्मक मानकांकडे पाहा. हे शक्य नसेल तर शांत राहणेच चांगले. कार्यालयात वातावरण चांगले नसेल तर खासगी माहिती देताना थोडा विचार करा किंवा ती देऊच नका.
वेळ ओळखा : खासगी माहिती देण्याआधी ती सध्या देणे आवश्यक आहे का, याचा विचार करा. यामुळे विश्वासार्हता वाढेल की नाही याचा विचार करा.(स्रोत : ‘बी युवरसेल्फ, बट केअरफुली,’ लीसा रोश आणि लेन ऑफरमॅन)
पुढे जाण्यासाठी असे वर्तन ठेवा
चांगला लीडर होण्यासाठी सहका-यांकडून कोणत्या प्रकारचे काम करून घेण्याची इच्छा आहे, यावर लक्ष केंद्रित करा. सहका-यांना या कामाची माहिती स्वत: सांगा. यामध्ये कोणत्या कन्सल्टंटला सहभागी करून घेऊ नका. संस्थेच्या लीडरला काय करायला हवे, हेपण सांगा. उदा: दुस-यांना प्रेरणा मिळेल या दृष्टीने रोल मॉडेलप्रमाणे वागणूक असायला हवी. कमीत कमी वेळात एखादी गोष्ट सांगणारे वास्तवातील लीडर व्हा. एखाद्या विशिष्ट गुणासह आचरण ठेवल्यास अन्य लोक तुमचे अनुकरण करत राहतील.
(स्रोत : ‘हाऊ शुड युवर लीडर्स बीहेव?’, केव्हिन शेरर)
उद्दिष्ट गाठायचे तर चिकाटी ठेवा
एक सक्षम प्रशिक्षक कर्मचा-यांना त्यांची कार्यक्षमता वाढवणे, कामगिरीत सुधारणा आणि यशप्राप्तीसाठी तयार करतो.
* काही जण कमी वेळात शिकतात, माहिती जमवतात व त्यावर चिंतन करतात. प्रशिक्षणामध्ये या दोन पद्धतींचाच समावेश आहे.
* जे लोक चिकाटीने शिकतात, ते ध्येयप्राप्तीसाठी वेगाने पुढे जातात. कुठलाही गाजावाजा न करता ते आपल्या कामात गुंतून घेतात. यामुळे त्यांची कामाची एक स्टाइल तयार होते. यात ते यशस्वी होतात.
(स्रोत : ‘एचबीआर गाइड टू कोचिंग युवर एम्प्लाइज’)
या पद्धतीने स्टेट्स बनू शकते
वैयक्तिकरीत्या आपली किती प्रगती वा अधोगती झाली यावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येऊ शकतो. मग तुम्ही भावनात्मक, सामाजिक वा अन्य कुठल्या पातळीवर वरती असा. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे नाथान सी. पेतित यांच्या नेतत्वाखालील पथकाने केलेल्या अभ्यासात जे लोक भावनात्मक पातळीच्या वर येतात, त्यांची प्रतिष्ठा दहा लोकांमध्ये चौथ्या स्थानावर आहे. असे लोक प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून पहिल्या नऊ जणांमध्ये आपले स्थान मजबूत करून यशस्वी ठरतात.
(स्रोत : सायकॉलॉजिकल सायन्स)
आवश्यक कामात काही लोकच जोडा
फुप्फुसातील एक ग्रंथी शोधण्याच्या कामात दोन डझन रेडिओलॉजिस्टपैकी 83 टक्के व्यक्तींनी बाहेर उभ्या गोरिलाकडे दुर्लक्ष केले. वास्तवात त्या ग्रंथीच्या आकारापेक्षा हा 48 पट मोठा होता. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या ट्रेफ्टन र्ड्यूच्या टीममधील बहुतांश सदस्यांनी त्या ग्रंथीच्या संशोधनाच्या प्रयोगानंतर गोरिलाला पाहिल्याचे अनेकांनी सांगितले. काही लोकांना एखाद्या विशिष्ट कामात सामावून घेतल्यास ते एवढे मग्न होतात की, आपल्याशी संबंध नसलेले दृश्य ते पाहू शकत नाहीत.
(स्रोत : सायकॉलॉजिकल सायन्स)
अव्यवस्थित व अस्वच्छ खोलीत जास्त सर्जनशील विचार घोळतील
एका खोलीत काही संशोधक बसले असतील तर त्या खोलीत कुठल्याही प्रकारचा बदल केला जाऊ नये, असे युनिव्हसिर्टी ऑफ मिनिसोटाच्या कॅथलीन डी वोह्य यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वपूर्ण संशोधनात दिसून आले. त्या खोलीतील टेबल व साहित्य अस्ताव्यस्त पडलेलेच राहू दिल्यास या लोकांमध्ये पाच जास्त सर्जनशील विचार घोळतात. खोली स्वच्छ केल्यास सर्जनशील विचाराची शृंखला मोडित निघते. हे सर्व पिंग-पॉँग बॉलच्या नव्या वापरावर विचार करत होते, आणि खोली जैसे थे ठेवल्यास निष्कर्ष चांगले येतील. ही खोली स्वच्छ ठेवल्यास डोक्यात सर्जनशील विचार घोळण्याचा पारंपरिक विचाराचा आधार नष्ट होईल.
(स्रोत : सायकॉलॉजिकल सायन्स)