आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील ऐतिहासिक बी-17 विमान देशांतर्गत भ्रमंतीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील हवाई दलात बोइंग बी-१७ फ्लाइंग फोर्टेसला खूप महत्त्व आहे.  दुसऱ्या महायुद्धात या विमानाने मोठी भूमिका पार पाडली होती. आजही हे विमान कार्यरत असून या वर्षी ते संपूर्ण अमेरिका भ्रमण करत आहे. याद्वारे नागरिकांना इतिहासाची माहिती दिली जात आहे. बाजूच्या छायाचित्रात हे विमान सॅन फ्रान्सिस्कोच्या गोल्डन गेट ब्रिजवरून जात आहे. बॉम्बवर्षाव करण्यास समर्थ असलेल्या या विमानात स्वयंचलित मशीनगनदेखील आहेत.  

- जुलै १९३५ मध्ये या विमानाने पहिले उड्डाण केले होते. १९३८ मध्ये ते सेवेत रुजू झाले. त्याचा वेग ताशी ५६२ किलोमीटर एवढा आहे. 

- दुसऱ्या महायुद्धात याच विमानाद्वारे अमेरिकी सैनिकाने सर्वाधिक बॉम्बवर्षाव केला होता. जर्मनीत या विमानाने १५ लाख टन बॉम्ब टाकले होते.
बातम्या आणखी आहेत...