आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात हे काय घडले?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्लेषण: १० प्रश्नांची उत्तरे
 
- प्रश्न १ : उत्तर प्रदेशात हे काय घडले ?  
उत्तर : चमत्कार ! सर्वाधिक आश्चर्याचा धक्का खुद्द भाजपला बसलाय.   

- प्रश्न २ : भाजपच्या अशा कल्पनातीत विजयाचे कारण ?  
उत्तर: तीन कारणे आहेत. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी.  

- प्रश्न ३ : पार्टी, धोरण, कामगिरी यापैकी कोणतेही कारण नाही का?  
उत्तर : हे तीनही घटक महत्त्वपूर्ण ठरले. मात्र ही तिन्ही नरेंद्र मोदी यांची माध्यमे ठरली आहेत. तीन समूहांमध्ये विभागून या माध्यमांकडे पाहता येईल. केंद्राची धोरणे, भाजप,सपा-बसपा. या तिन्ही घटकांना प्रत्येकी तीन गुणांकन दिले गेले पाहिजेत.  

अ. नोटबंदी. सर्जिकल स्ट्राइक. उज्ज्वला एलपीजी योजना.  
ब. अमित शहा. भाजप कार्यकर्ते. पार्टीत ‘करा वा मरा’सारखी रणनीती.  
क. ‘यादवी’ माजल्याने नाट्यमयरीत्या बदल. अखिलेश यांना आलेली घमेंड. मायावती यांचा खच्ची झालेला आत्मविश्वास.  

- प्रश्न ४: आणि काँग्रेस?  
उत्तर : गेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांपासूनच एक उपमा प्रचलित झाली: ‘उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची झाली तशी अवस्था करून सोडू...’हे वातावरण पाहता ७ जागा मिळणेदेखील आश्चर्यकारक आहे. मात्र पंजाबचा शक्तिशाली विजय आणि मणिपूर, गोव्यात चांगला कौल त्याला नवी ऊर्जा देऊ शकतात. काँग्रेसजन म्हणत आहेत की पंजाबचा विजय राहुल गांधींचा नाही. हा आपला शेवटचा लढा आहे म्हणणाऱ्या  कॅप्टन अमरिंदर यांचे हे यश आहे.  

- प्रश्न ५ : जाती-धर्माचे राजकारण संपल्याचे हे शुभसंकेत आहेत का ?  
उत्तर : मतदारांना तीन गोष्टी हव्या आहेत: अ) काम  ब) संपर्क  क) करिश्मा. मात्र नेते आणि राजकीय पक्ष कोणतीच जोखीम घेणार नाहीत. सपा-काँग्रेस यांचे यादव-मुस्लिम समर्थन संपुष्टात आल्याचे चित्र आहे. मायावतींची जाटव- मुस्लिम-ब्राम्हण व्होट बँक रिकामी झाली आहे. भाजपला गैर-यादव,मागास, गैर-जाटव दलित आणि व्यापक हिंदू मत आज थिटे झाले आहे. कारण सुनामी आहे. मात्र प्रत्येक गाव, प्रत्येक गल्लीत सर्व पक्षांनी जाती-धर्माच्या निकषांवरच घुसखोरी केली आहे. करत राहतील. जनतेने मात्र जात आधारित राजकारण नाकारले आहे असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.  

- प्रश्न ६ : मुस्लिम भाजपला मत देत आहेत का ?  
उत्तर : भाजप सतत मुस्लिम मत मिळवत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात ९२ मुस्लिमबहुल जागा भाजपला (४१ जागा) मिळाल्या. यंदादेखील एकूण १२९ पैकी ९९ जागा भाजपला आहेत.

- प्रश्न ७ : या वादळी जनादेशाचे सखोल विश्लेषण काय आहे?  
उत्तर : सर्व विश्लेषणे निरर्थक ठरली. व्यर्थ गेली. आपण प्रत्येक मताचे एक काल्पनिक कारण देऊ शकतो. चुरशीच्या आणि कोंडी करणाऱ्या निवडणुका हेच विश्लेषण अर्थपूर्ण आहे.  

- प्रश्न ८ : चकित करणारी एखादी बाब ?  
उत्तर : उज्ज्वला योजना. या अंतर्गत वितरित झालेल्या सिलिंडर्समुळे भाजपला महिलांची मते मिळाली. हे महत्त्वाचे कारण आहे. मागास आणि आर्थिक अनुशेष असलेल्या परिसरात गरीब-दलित कुटुंबांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली. ते सपा-बसपाचेे शुभचिंतक होते. काँग्रेसला मनरेगाचा लाभ मिळाला होता तसाच भाजपला उज्ज्वलाचा लाभ मिळाला. नोटाबंदीचा निर्णय श्रीमंतांविरुद्धचा असल्याचे गरिबांना वाटल्याने त्यांनी याचे समर्थन केले. बाहुबलींना निवडत आलेला उत्तर प्रदेश सर्जिकल स्ट्राइकने प्रभावित झाला.

- प्रश्न ९ : या विजयाने मोदींमध्ये बदल होतील का ? 
उत्तर : मोदी जसे आहेत तसेच राहणार. त्यांची नैसर्गिक वृत्ती अशीच आहे. बिहारच्या पराभवानंतर भरपूर चर्चा झाली होती. मात्र त्या वेळीही मी लिहिले होते की त्यांच्यात बदल होणार नाही.  
मोदींना १% शक्यता दिसल्या तर ते ९९% साठी कामाला लागतात. जोखीम घेत ते लवकर आणि अधिक निर्णय घेतात. त्यांचा स्वभाव आक्रमक आहे.  

- प्रश्न १० : विरोधी पक्षांमध्ये काय बदल होतील?  
उत्तर : राज्यांमधून विरोधी पक्षांचे अस्तित्व नष्ट होत आहे. प्रादेशिक पक्षांची सद्दी संपत असल्याचे चित्र आहे. विरोधकांची एकजूट तुटत आहे. संपूर्ण बदल करणे त्यांच्यासाठी गरजेचे झाले आहे. मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...